Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
दुष्ट स्त्रियेचे दुर्बुत्धीनें कृतृम पुत्र येकजण निर्माण होऊन त्यालाच बाई शाहाजी राजा ह्मणून नावें ठेविल्यावरीं कृतृमव्यक्त होऊन त्या कृतृम पुत्राचा परिहारहीं जाहला होता ह्मणून वरी लिहिलें आहे । कीं सांप्रत कौयाजीघाटका ह्मण्णारानें तो सवाई शाहाजी राजा ह्मण्णार मूलवांचला आहे ह्मणून, कुप्पी ह्मणून येक बटीक, तिचा लेंकरूप वयानें सदृश होता, त्यालाच तो शहाजी राजा वांचला तो ह्मणून प्रख्यात करून, त्याला घेऊन वडेर पाळ्याचे राणांत बसून समस्ता नाचें नातें रहस्यांत पाळेगार वगै-यांस भ्रम घालून त्यांकडून थोडे द्रव्य संपादून थोडी फौजहीं जमा करून, तदनंतरें देवणा पट्टणांत असणार इंग्ररेजासी संविधान करून त्यांस नानाविध सांगून त्यांकडून कित्येक उपपत्ति करूनघेऊन तेथून नागपट्टण वगैरे स्तलांतून पलांदेवाल्याकडून कांहीं द्रव्य घेऊन फोजबंदी करून तंजाउरांत असणार फौजेस व किल्लेदारांस भ्रमास घालून त्यांच्या अंतरंगशल्या वरून शकें १६६० कालयुक्ती संवत्सरी किल्ला प्रवेश करून राज्य पद करणार सुजानबाईसाहेबास लोटून परतें करून आपण तक्तनिशीनें जाहले । तो राणांतून आला ह्मणून त्याला बांट राजा ह्मणून लोकवदंती जाहली त्या काट राजानें थोडेच दिवस राज्य करण्यानें त्याचे चर्चे वरून वळखून पेस्जी त्याचे भ्रमांत पडले । ते किल्लेदार व फौजेसहीं हा काटराजा कुप्पी बटकीचा लेंक याच नावें सुभान्या; कृपृये कडून राज्य पदास आला ह्मणावयाचें निश्चय कडून कळून अह्मी राजद्रोह करून बटकीचे लेंकांस तखती बैसविलों की; ह्मणउन केवळ पश्चाताप पाऊन तजविज केली जे, तुकोजी राजानी परीग्रहकेल्यास्त्रियां पैकी प्रतापसिव्हंराजाचि माय राजाचे समजातीची जाहात्याकरितां, राजपुत्र व राजास योग्य, ह्मणुन सर्वत्रांनीं निष्कर्षकरून शके १६६१ सित्धर्यिसंवत्सरी प्रतापसिव्हं राजास तक्त निशीनें केले । तोच शके त्याच वर्षीं प्रतापसिव्हं राजानीं लग्न केले । पट्टस्त्रियां पैकी दुसरीस्त्री दुणगोची लेंके द्रोपदीबाईसाहेबाचे उदरी प्रतापसिव्हं राजापासुन तुळजाराजे जन्म पावले ।