येणें प्रमाणें लेंक लेंकी नातुंडें हीं अपल्या समोर दैवगतीस पावल्या कारतां तुळजा महाराजास अपलें हीं शरीर त्याग जाहल्या हीं दुःख शमन याविना दुसरा मनास उपाय नाहीं ह्मणऊन बहुत व्यसनानें अधिक वैरेग्येंकडून अन्नो दकाची चाडदेखील न राखितां कालक्रमूं लागले, तेणें कडून शरीरास महद्रोग उद्भऊन त्या रोगानच तीनि वर्षे काल क्रमिले ऐसें असतां नवाब हेदेरअल्लीखान ह्मण्णार आर्काड चन्नपटण प्रांतावरि मोहिमेस आला तो तंजाउर किल्याकडे येऊन उतरून गोळे मारून किल्ल्यांत इंग्रेजांची फौज होती त्यास हीं लढाई करून तंजाउरचा मुलुक समग्र जप्ती केला, त्या दिवसांत तंजाउर देशाचे व किल्ल्यांतही केवळ क्षाम पडून दाणा मिळेनासें समई सकळ जनक्षोभहीं होऊन रोजगार बहुत मनुष्य मरूं लागली सहाशें सातशें येणें प्रमाणें जाऊं लागले तेव्हां त्या क्षामांत निर्वाह नाहीसें शेवट मनुष्यास मनुष्यानें बक्षिलें. तेव्हड्यानें क्षोमवकलाप दोनी वारून गेला. तदनंतरें अपलें शरीर या उपरी राहिना ह्मणावयाचे निश्चयेकडून कळल्या वरी योचना केलेजे अपल्यास जाहले पुत्र व नातुंडें ही आपल्या पुढेंच परलोक गतीस पावले सांप्रत अपले शरीर हीं राहीना,अपल्या उत्तर कृयेसहीं व राज्य परि पालने नहीं कोण्ही योग्य बाध्य नाही करितां पुत्र पाहिजे तरी अपले वडील केवळ राजऋषी प्रमाणें बहु कीर्ती संपादून सकळ सोयरे लोकानी हीं त्यांचे योग्यंतस वश्य होऊन त्यांचा अंगिकार करून आपण होऊन मिळावं या जोगें वर्तणूक केले तरीही तुकोजी राजाचे लग्न करीनाते बाइकाचे पाटी जन्मलाते ह्मणावयाचा येक कळंक राहूनच गेला असतां तशा कोणत्या शद्बाम हीं ठाव न राहतां अपुले स्वकुलांत स्वगोत्री दाइजा पैकी रूप गुणेंकडून युक्त ऐशा मुलास विधियुक्त दत्त घेऊन जातकर्म हीं संस्कार हीं करून शरफाजी राजे ह्मणून नामकरण केले. आतां ते शरफोजीराजे कोणाच्या वंशातील कळवें यास लिहितों जे,