भोंसल वंशांत आदिपुरुष शंभू राजापासून तेरावे पुरुष बावाजी राजे यांचे पोटी मालोजी राजे येक विठोरीराजे येक दोघे जन्मले म्हणून ही मालोजी राजाचे पोटी शाहाजी राजे जाहले त्या शाहजी राजाचे पोटी शिवाजी राजे येकोजीराजे जन्मले त्यांचा ख्याते लिहून दुसरे पुत्र विठोजी राजाची ख्याती ही कित्येक लिहून त्या विठोजी राजाची संत्ततीच आतां सातारांत राज्य करणार हीं व पणाळांत राज्य करणार हीं ह्मणावयाचा अर्थ ऐकंदर विस्तारें कडून वरी लिहिलें आहेकीं सांप्रत तुळजाराजानी दत्त घेतले शरफोजीराजे त्या विठोजी राजाचे वंशाचेच जाहल्या करितां तो विस्तार जाणवितों जे विठोजी राजाचे लेंक आठजणापैकीं शवटील लेंक त्र्यंबकजी राजास जाहल्या लेंकापैकीं गंगाजीराजे ह्मणून येक लेंक त्या गंगाजीराजास उवाजीराजे येक व तावोजरिराजे येक ऐशे दोघे लेंक या तावोजीराजाचे संततीस प्रसंगानुसार लिहिलें जाईल प्रस्तुत त्या उवाजी राजाचेलेंक सुभानजीराजे त्या सुभानजी राजाचे पोटी उवाजीराजे ह्मणून येक व शहाजीराजे ह्मणून येक ऐशे दोघे लेंक या पैकी शहाजी राजाचे पोटी जन्मले तेच शरफोजी राजे यास तुळजामहाराजानी उत्तम वंश करितां उत्तम रीतीनें विहित प्रकारें शास्त्रास अनुसरून विधियुक्त दत्त घेऊन हत्ती वरी नौबते निशी गावांत समग्र साखरे वांटून सकळ सोय-यासहीं जेवण करऊन त्यावेळेस हनर विल्ल इंग्रेज कुंफणीचे सरदार तंजाउरचे किल्ल्यांत होते ते मेस्तर जान्ह डालब्लन् रासन्डेट व मेस्तर इपसली मेस्तर व करणल मेस्तर व ऊष्टोटकमेडर व मेस्तर सार्च पादरी या चौघाचे हाती ही या शर फोजीराजास या राज्याची सहज बाघ्यता असतांहीं न्यायशास्त्रा प्रकारें अह्मी दत्त घेतलें आहे आमच्या राज्यास व भाग्यास व वंशास हीं हेच अधिपति यास तुमच्या हाती ओपितों आह्मा माघार या शरफोजी राजाकडूनच राज्यतंत्र चालऊन सर्व विध अभिमानें कडून याचे संरक्ष करावें ह्मणून या चौघे सरदारांचे हाती