. नितिवेत ऐशा इंग्रेजा कडून महाराजास अपलेंच राज्यपद प्राप्ती नंतरें महाराजानी केला तजवीज काय ह्मणिजें वणीस करजाती चे व हीणवर्ण जातीश्यास समीपता व अमात्य पदहीं दिल्ह्या करितां ब्राह्मण हत्यादि पातकें राज्य नष्ट होण्यास हीं कारण जाहलें या उपरी उत्तम जाती ब्राह्मण जाहल्या करितां द्रोह करिनात अगाध कृत्यास ही भीतील ह्मणून अपुले अमात्य पद येकामागयेक ब्राह्मणासच शेवटोर चालविले, याउपरी तुळजा महाराजानी आपण लग्न केल्या स्त्रियापैकीं मोहनाबाईसाहेब ह्मण्णार नवाब महमदल्लीखानानी किल्ला घेत्या अपिल वर्षी प्रसव होऊन पुत्रास हीत दैवगतीस पावले होते. उरल्या दोघी स्त्रीया राजसबाईसाहेब जेष्ट राजकुमारबाईसाहेब दुसरे या दोघी स्त्रियांसहीं पुत्र संतान नाहीं याउपरी होण्यास हीं होईल न होईल ह्मणावयाचा संदेह भासल्या करितां पुत्र संतानार्थ दोन लग्न केले त्यांत येक स्त्री महाडीकाची कन्या सुलक्षणाबाई ह्मण्णार दुसरी इंगळ्याची लेंके मोहनाबाईसाहेब ह्मण्णार ऐशी दोनि लग्न करून घेतिली त्यापैकीं राहिल्या स्त्रिया चौघे मोहनाबाई साहेबाचे उदरी प्रथम पुत्रसंतान होऊन दाहा दिवसांतच तो पुत्र देवगतीस पावला तदनंतरें त्याच मोहनाबाइसाहेबाचे उदरी अपदुल प्रतपराम जन्मले,ते अपदुल प्रतापराजे सहावर्षे वहाडून शेवट देवी दाखऊन त्या उपद्रवानें परलोक गतीस पावले या खेरीज राजाचे दुसरे स्त्रीचे पोटी येक कन्या जाहली ते आठ वर्षास लग्न करून दिल्हे ह्मणावयाचा अर्थ वरी लिहिला आहेकीं या लेंकीच्या पोटी येक पुत्र मारूतसामि ह्मणून येक कन्या शांता ह्मणून ऐशी दोने लेंकरें जाहली त्या दोघे लेंकरांस ठेऊन राजाची लेंके अपरुपबाइसाहेब ह्मण्णार दैवगतीस पावले होते त्या दोघे लेंकरांसहीं तुळजामहाराजच मात्रें कृपे कडून संरक्षित होते. दैवयो गें कडून ते दोघे लेंकरें हीं अपदल प्रतापरामराजे दैवगतीस पावले वर्षात नातुंडें मारूती सामिवशांत या हीं दैवगतीस पावले