सर्कारचे मार्फतीनें देत येणेंच केले होते. तो घट्ट ह्मणावयाचा बाधा हुसेन. खान्सुराच्या विपरीत बुत्धी उदकाचे प्रवाहानें, उखलिला करितां त्या आधारावरी होता त्या संस्थानास धक्का येईल अथवा आला ह्मणावयास संदेह नाहींसा जाहला. तदनंतरें तुळजा महाराजानी आपल्या अंकित लोकांचे बुत्धीस अनुसरून, इस्तकबिल तुकोजी महाराजाचे दिवासापासून रामनाथपूरचे पाळेगारांस सहाय संपती करावयाची चाले संस्थानांत आहे ह्मणावयाचं आधारावरून, व याखेरीज नागपट्टण बदरानें महाराजास प्रेषकषी द्यावयाचे हत्ती जाहाजावरी येत होत, ते जाहज रामनाथ पुरचे तालच्या कांठास लागला, ह्मणून रामनाथपुरच्यानी ते हत्ती काहडून घेऊन, ते हत्ती महाराजाचे ह्मणून कळूनहीं न देतां ठेऊन घेतल्या करितां, महाराज रोषांत्कर्षित पाऊन रामनाथ पुरावरी चाले करून ते किल्ला वेढून युत्ध करून किल्ला ही पाऊन, तो किल्ला हस्तगत होते समयीं तुळजामहाराजानी युक्तायुक्त प्रसक्ती व अप्रसक्तिचे तजवीजेंत मन प्रेरून रामनाथपुरचा किल्ला न घेतां, त्यांचा त्याग राखून त्याकडून अपुल्या फौजेची वर्तवन ह्मणून कांहीं कांहीं घेऊन तंजाउरास पाउन सवेंच आपली कन्या घांटक्यास देऊन, बहूत सन्नाहनिशी बहुत खर्च करून लग्न केले. त्या येकंदर खर्चामुळें नवाबास द्यावयाची प्रेषकषी दोन वर्षांची बाकी राहिली तेव्हां नवाब महमदल्लीखानानी तजवीज केली जे, तंजाऊरचे तुळजाराजे बुत्धीवंत आणि प्रबळहीं; उत्तरेकडील ह्मराठ्याचे अनुसंधानाचे हीं, आणि प्रथम वयस्थ शूर जाहल्या करितां कधिहीं आपुले योग्गितानुसार प्रवर्ततील तेव्हां आह्मासहीं जड होईल, यास्तव कोणे रीतीहीं यांस हाताखाले घ्यावयास प्रस्तूत प्रेषकषीची बाकी हीं आहे. याचि मागणी करितांच फौज जमा करावी, प्रसंगानुसार तंजाउरचें राज्य आक्रमून राजासहीं वश्यास आणावें, कदाचित् त्यानी प्रेषकषो देऊन सोडिल्यांहों क्रमेंकडून राज्य आक्रमून, राज्यास आपले हाताखाले वणेंव, कार्य परंतू वेगळे योचना कामाची नाही.