महाराजानी सांगून पाठविल्या उतरास, नवाबाचे उतरास ताळा पडनासें, महाराजानी फौज सन्नत्ध करून युत्धास सित्ध जाहले. तेव्हां इंगरेज सरकारच्या सरदारानी, महाराजानी, नवाबास केला उपकार आणी आपल्यासी राखिला विधही मनास आणुन नवाबासही मागावयाच्या रीतीचे सांगून, आपल्या मद्यस्तीनें माघील राहीला प्रेषकषीस येक हद्ध करून याउपरी प्रतिवर्षी हीं द्यावेंयाची प्रेषकषी इंगरेज सरकारचे मारफतीनें देणें, ह्मणून वारून उभयतांस बूदल्र्चेस्तळांत भेटीचे सविधान करून समाधान केले. त्या दिवासांत लेंक, तुळजामहाराजास दुसरी स्त्री राजकुमारबाईसाहेबाचे उदरी येक कन्या जन्मली. पेसजी मृत झाल, त्या बाई शाहजी राजा ह्मणार वांचला आहे, ह्मणून कुप्पी बटकीचा लेंक सुभान्यास तंजाऊर राज्य प्राप्त व्हावें याजोगें केल्या, कोथाजी घाटका उघडून गेला तो अरयल्लर्चे राणांत येक्या खेड्यांत आला; हे ह्मणावयाचें महाराजास कळून दोघे विश्वसूक आप्त शिपाई त्या बरोबरी कित्येकांसहीं देऊन पाठऊन त्या कोथाजी घांटक्यास मारून टाकिले येणेंप्रमाण प्रतापसिंव्हमहाराजानीं राज्य करण्यांत उत्तम पुढाय कीर्ती विस्तारली. त्यो विस्तार थोडा जाणवितों. ते उत्तर देश सातार, पुना, अवरंगाबाद पावेतो हीं; व पूर्व दिशे समुद्र, मध्य प्रदेश, अच्चीयाळपाण खंडी देश, शिंगळ द्वीपापावेतो हीं; दक्षिण प्रदेश मलयाल, कोलब कोच्ची, गिडडाधाली, श्रीरंगपट्टण देश, बुदलूर देश, गुत्ती, कष्णातीर, पनालगड पावेतो हीं; प्रतापसिंव्हमहाराजाची उत्तम रीती उत्तम चलंती दान धर्महीं धर्म कीर्ति हीं औदार्य शौर्यपर राज्य भयंकर इत्यादिकीतर्तो पसरल्या आणी स्वराज्या तेज, व समग्रहीं महाराजाचा दानादि औदार्य गुणें कडून हीं जनरजक शक्ति कडूनहीं, सकळ उपजीविकेचे प्रभास समग्र हीं सुखावल्या ऐशा महाराजास, परलोक प्रयण दिवस समीपल्याचें कित्येक चिन्हें दिसूं लागली. त्याचा विस्तार थोडा जाणवितों. प्रथम निर्याणास सहा महिन्या आगोदरीपासून, महाराजाची चित्तवृत्ती अतिशय कोपा