ह्मणून निश्चय करून प्रेकषीची मागणें केलें. तेव्हां कालवशांत राजाची बुत्धी दुंर्मुत्री यानी अपहारून निराकरण उत्तर लिहितेसें केलें तेव्हड्यानें नवाब महमदल्लीखान राजाचे वडिलानी केला उपकार न आठवितां, राज्यतंत्रावरीच दृष्टी देऊन राज्य आक्रमणेच बुत्धीनें आपुले ज्येष्ट पुत्र उमदत्उम्र याबरोबरी फौज व युत्धसन्नाहहीं देऊन युत्धास पाठविले त्यानी तंजाउरचा किल्ला वेढून युत्ध केले, तेव्हां ज्या दुर्मेत्रीनी राजाची बुत्धी चोरून युत्धास प्रवर्तविले, की त्यांस युत्ध सामर्थे ही पुरनासें, पुढिले योचनेसहीं मदत्व पाऊन संविधान करावें ह्मणऊन राजास विनऊ लागले. तेव्हां राजानी योचना करून पुरातन वडिलाचे वेळेस सामादिक येक दोघांसी तजबीज करून संविधान बालुन, फौजेचा खर्च पन्नास साठे लाख रुप्पये पावतो वारून घेऊन कांहीं नग मालही दिल्हा जाता, वरकडांस अर्धामुलुकाचा महसूल ईड करून दिल्हें. त्यानतरें उमदतुलउमरानी तंजाउरच्या किल्यासमीप तीन कोसावरी पश्चिमेकडे वल्लचा किल्ला आहे, त्यांत आपलें ठाणें ठेंऊन येलंगाडचा मुलुक नवा बाबींच दिल्हा होता,तो आपुले स्वाधीन करून घेऊन आपले फौज घेऊन त्रिचनापल्लीस पावले. तदनंतरें महाराजानी चन्नपटणास नवाबाकडे आपल्याकडील सरदार यशवंतराव सूर्यवंशी ह्मण्णारास पाठऊन कित्येक संविधान सांगून पाठविले. त्यास नवाबाचे मनोगत वेगळेंच कळवितां, त्या सरदाराबरोबरी येक घोडा वस्त्र पत्रमान पाठविले. परतु संधीसमाधान केले नाहीत. तदनंतरें नवाबानी आपले बाकीचे रुपये समग्र झाड्यानिशि पावत झाल्यावरी, येक वर्षानंतरें तुळजामहाराजास ऐवज समग्र नवाबास पावल्या करितां, फौजेच्या देणेस तुटरा पडल्यासमई त्या लोकांस समग्रहीं लांच देऊन फोडुन त्यानी भांडण्यास फितवा करून, कित्येक सरदारांसहीं फितव्यानें भेद करून राज्येच आक्रमावें ह्मणावयाचे योचनेनें त्यावेळेस मराठ्याकडील येक सरदार माधवराव् सदाशिव ह्मण्णार चन्नपटणास नवाबाकडे चौथाईस्तव आले त्यास,