तेव्हां महाराजानी महमद इस्पखान्कुमंदान् त्रिचनापल्लीतून जाणार बरोबरी चारी पांचशें स्वार वगैरे कुमक पाठविले. त्या महाराजाकडील कुमकेच्या फौजेनी चन्नपट्टणावरी उतरला मुसेलालीचा लष्करास कोणती रस्तहीं येऊं देइनासें व फौजही यैऊं देईनासे बहुत मारामारी करून वाट बंद केले. त्याउपरी मुसेलालीच्या फौजेचा निर्वाह नाहींसें मुसेलाली पुदच्चेरीस येऊन पावला दुसरा कित्ता पिकट साहेब कारेक्यालावरी येऊन उतरले तेव्हां महाराजाचा कुमक अपेक्षिले तेव्हांही महाराजानी कुमक पाटऊन साहाय केले. तदनंतरें तिसरा कित्ता पिकटसाहेब पुदच्चेरीचे किल्यावरी जाऊन उतरून लडाई केले तेव्हांही ममहाराजाची कुमक अपेक्षिले तेव्हांहीं महाराजानी भारी कुमक पाठऊन सहाय केले येणें प्रमाणे तीनी कित्ताही इंगरेचाचे खांसराज कारणास महाराजानी कुमक करून सहाय केल्याकरितां पिकटसाहेब फार संतोष पाऊन आमण विलायतीस जात्या आगाधरी मेस्तर डुप्लिकेस ह्मण्णार सरदारास महाराजाकडें पाठऊन महाराज व इंगरजाचे स्नेहाते पुरोवृत्धीस येकत्रहीं केले. तदनंतरें मानाजीराव जगताफ यास सरखेली व फौजदारी चालत होती परंतू मानाजीरायाची चलंती कोणेंतें योग्यतेस हीं युक्त नव्हतें करितां मारून टाकावें तरी माफ व येक दोघांस त्यांच्या अकृत्यास्तव मारिले तरीहीं मारावें ह्मणावयाचें महाराजाचे चित्ती नव्हत करितां मानाजी रायास न मारितां सरखेली पदमात्र काहडून ब्राह्मणाची जाते कोणत्या कृत्रिमास हीं धजणार नव्हे आणी भीऊन बुत्धीनें वर्तणूक करतील ह्मणावयाचें निश्चये कडून सकळ राज्यतंत्रहीं डबीर हारीपंताचे स्वाधीन करून शेवटोर हीं चालवीत आले. तदनंतरे नवाब महमदल्लीखान् त्रिचनापल्लींत येउन असून तंजाउरच्या महाराजांसीं प्रेषकषीचा जबाब स्वाल केले तेव्हां