महाराजानीं दोन महिने पावेतों किल्ला भांडऊन शेवटीं आपली फौज बाहेर काहडून मुशेलालीचे लष्करावरील तावा पाडून बहुत सोलदाज वगैरे कित्येक सरदारांसही मारून व कित्येक फौज मुलकावरी पाठऊन त्याचे लष्करास येक दाणारस्त येऊं देइनासें बंद केले होते तेणेंकडून मुसे मजकूर घाबरे होऊन भारी तोफा भारी फौज सरजाम्जडगीर कित्येक टाकून देऊन अघादत्वरेनें मजल दरमजल करून पुदच्चेरसि पावले तेव्हां महाराजानीं आपल्या मुलुकास तमाम आज्ञा दिली जे या संस्तानांत परंपरेपासून चालत आला दंडकया मुलुकांत फरंगी मनुष्य कोण्ही आल्यानें त्यांस त्या त्या ठांईचे न काइजकातीतं हसल घ्यावें याची पद्धती फरंगी सरदार चालत येणारास असामी येकास पांच व्होन्न प्रमाणें व घोड्यावरी बसून येणारास त्यास अधीक फरंगीलोक पालखींत बसून आल्यानें त्यांस विशेष हसल आणा कांहीं फौज घेऊन कोणी फरंगी सरदार आलियां त्यानें अगाऊ महाराजास सांगून पाठवणें महाराजानीं जगातीवाल्यास हसल माफास परवानगी पाठऊन निरोप देणे येणें प्रमाणें पुरातन चालत आल्या दंडकास हल्लीं बंदरचे फरंगी कित्येकासी संस्थानास स्नेह विशेष जाहल्यामुळें याउपरि निरंतर त्यालोकांचा येव होत जाईल त्यांत हीं फौजेनिशी येणार आह्मास कळऊनच येतील त्याखेरीज येणार फरंगी अनेक कोणत्या बंदरातून कोण्यारीती आल्याहीं त्याकोणास आह्मापासून हसल् माफ केला असें घेणें गरज नाहीं ह्मणून आज्ञापिले. तदनंतरें पुदच्चेरीचे गौनरवजनरलही चन्न पट्टणचे किल्यास मोर्चे लाविले. तेव्हां चन्नपट्टणचे गौनर यानी महाराज चंदासाहेबाचा कलाप पडिल्यापासून हीं व नवबास महाराजानी केल्या उपकारास्तव हीं महाराजासी विशेष स्नेह राखिला होता करितां महाराजास कुमक पाठवावें ह्मणून लिहिले.