नवाबाचे कृत्य वश्य होऊन महाराजाचे मुलुकांत दुष्टचर्येस प्रवर्तल्या करितां, फौज व फौजदारास पाठवणेंस कारण जाहलें. तेंव्हां मानाजीराव फौजेनिशी जाऊन लढाई करून प्रथम हनुमंत गडाचा किल्ला, व मंगळगडाचा किल्ला, व कुवटीचा किल्ला, व वरूचा किल्ला, हे चारीही हल्ला करून घेऊन तिरवाडनिरीचा मुलुक हीं जमाकरून जास्ती आर्मूख कोटचा किल्यावर शह देऊन युत्ध केले. तेव्हां रामनाथ पुरचा नीबकुघ्रा किल्यावरूनही तंजावरांतून महाराजानी अन्यत्र कार्यास्तव, आर्मूख कोटचा किल्ला सोड्न येणें, ह्मणुन मानाजीरायांनी लिहिल्याकरितां मानाजीरायानी आमुख कोट नव्होतां, तिरवाडनीरीचा मुलुकास व साधिल्या किल्यास ठाणीं ठेवून तंजाउरास महाराजाकडे येऊन पोहचले. त्या संघींत नवाब महमदल्लीखानास हें वर्तमान कळून महाराजासी जवाब सवाल करणेंसें युक्त नाही; करितां सन १८६२ ईसवीत इंग्रजाचे सरदार मेस्तर आप्रीं ह्मणणारास, कागद लिहिले जे, त्रिचनापल्लीचा इलाखेंत असावयाचा मरवाराचे मुलुकांत महाराजानी हनुमंत गड, वगैरे किल्ले सात घेतलें ते नव्होता हनुमंत गडाचे कुमकेस करणल क्लियू ह्मण्णारानीं करणल हरनानातानिशान लिहून येक इंग्रेजी निशान पाठविले होते, तें घेऊन हनुमंत गडाच्या किल्यांत जाऊन होते. त्यांनी महाराजास उदंडा रितीनें सांगीतलें ते ऐकनासें हनुमंत गडी किल्लाही हल्ला हल्ला करून घेवून, करनल क्लिय्कडे होते ते इंग्रेजी निशानही फाडिले ह्मणुन लिहिले ते वर्तमानही महाराजास अवगत जाहले तदनंतरें कित्येक दिवसानें पुदच्चेरी बंदरास गउनरमेटचे अधिकारास मुसेलाली ह्मण्णार सरदार आला त्यानें पूर्वीं परिशोघन घेतां अकार्णीककडून तंजाउरचे राज्यावरी युद्धास आले तंजाउरचे राजानीं तुमच्या येंण्यास प्रसक्ती काय ह्मणुन विचारल्यास सदुत्तर न देतां येऊन तंजाउरच्या किल्यांत वेढा देऊन उतरले तेव्हां प्रतापसिंव्ह