आपण जरारीचन्नपटणीस थोडी इंग्रेजाची फौज घेऊन गेले. ते वर्तमान नंदराजा मुरारजी घोरपडे यांस कळून आपल्यास दगा देऊन गेले ह्मणून मुरारजी घोरपडे याचे भाऊ भुजंगराव, व त्यांचे जावई देखील, थोडे स्वारांनिशी पाठलाग करून पन्नीरट्टीतिरवादीकडे गांठून नवाबाचे पालखीवरी हल्ला केले. तेव्हां नवाबाकडील लोकांनी बंदुकाबार केल्यांत, मुरारजी यांचे भाऊ व जावई देखील ठार जाहले. नवाब पलीकडे निघुन गेले. पलीकडे गेले हे वर्तमान मुराररायास कळतांच, केवळ विमनस्क होऊन मुरारराव आपले फौजेनिशीं आपले स्वस्थळास निघून गेले. नंदराज उभय कावेरीतीर आक्रमून कित्येक दिवस जंबुकेश्वर प्रांतीं असून तदनंतरें आपलें श्रीरंगपट्टणास जाऊन पावले. तदनंतरें प्रतापसिंव्ह महाराजानी आपले पुत्र तुळजामहाराजास माहडीकाची लेंकें राजकुमार बाईसाहेबाशीं दुसरें लग्न करून दिल्हें. सवेंच साहा चारे महिन्यांत मोहित्याची लेकें मोहन बाईसाहेबास घेऊन तुळजाराजास तिसरें लग्न करून दिल्हें. याउपरी महाराजानी आपले फौजदार मानाजीरायास दक्षिण प्रांतास पाटवणेंस येक कारण जाहलें; तें काय ह्मणीजें रामनाथपुरचे जमीदार मरवर? महाराजाचे आश्रयांत केव्हांही असणार, तरीही नूतन धाकुटी वयस्थास अधिपत्य प्राप्त जाहल्यामुळें, आपल्या यौवनमदकडून कांहीं कुमकही मिळून घेऊन नवाबमहमदल्ली खानाचा आश्रय दृढ ह्मणून समजून, दक्षिणप्रांत महाराजाचे मुलूकांत थोडी दुष्टचर्या आरंभिला. येक दोन वेळेस महाराजानी क्षमाकरून हीं पाहिले, तदनंतरे त्यांत, नवाबचे कृतृमही थोडे आहेसें जाणुन, दक्षिणप्रांत तिरवाडनिरीचा मुलूक कधिही तंजाउर संस्थानासी मिळेल, ते महाराज रामेश्वर यात्रा गेलेस रामनाथपुरचें अधिपत्य करणार मरवर वडील होता, त्याने महाराजाची शेवा फार करून आर्जल्यामुळें तो तिरवाडनिरीचा मुलुक याचे दाक्षिण्यास्तव, थोडे दिवस त्याला सोडिले होते त्यास त्याचाच ल्योंक मरवराने