पाठवा ह्यणुन लिहिलें. तेव्हां चंदासाहेब दृष्टीस आड झाला ते वर्तमान नबाब महमदअल्लीखानास कळून शोध घेतल्या ठांई तिसरे दिवसीं तंजावरचे लष्करांत आहे ते कळून तेव्हां मानाजीरायास व महाराजासही प्रार्थना केली जे महाराजामुळें माझा जीव राहीला महाराजानी आस्त्रा दिल्या करितां वाचून पुनः माझ्या भाग्यास पावलों त्या वेळेस हिरास्तत मोहिदीनखान् व चंदासाहेब आले. तेव्हां हीं माझा जोहार करून मला आस्त्रा देणार केला धैर्यवंत होता तैशा वेळेस महाराजानीं मजमुळें आलाच पाहून घेतो ह्मणावें या धैर्यानें मला आस्त्रा दिल्यामुळें मी पुनः दवलतसा जाहलों आतांही तेशीच दया करून माझ्या बापाचा दावा म्या घेईजेसें चंदासाहेबास मला द्यावें ह्मणून बहुतरीतीनें प्रार्थिलें याखेरीज नंदराज व मुरारजी घोरपडे यांनींही चंदासाहेबास आपल्यापाशी ओपावें ह्मणुन कांहीं जोरानहीं मागूं लागले तेव्हां मानाजीरायास व त्यास ही चर्चा होऊन जीत कदापी ओपणार नाहीं ह्मणुन चंदासाहेबास मारून सोडिले सन १८५२ जून माहे तारीख ३ स चंदासाहेबाचे डोस्कें कापून नबाबाकडेस पाठऊन मानाजीराव तंजावरास निघून आले या अगोदरी तंजाउरची फौज कुमकेस येताना सन १८५२ इसवी येप्रेल तारीख २१ स मानाजीराव यानी कोवीलडीचे किल्यांत फ्राशीसाचें ठाणें होते ते उठउन किला स्वाधीन करून घेतले तदनंतरें चंदासाहेबाचें डोस्कें कापिल्यानंतरें नबाब महमदल्ली खानानी प्रतापसिंव्ह महारजांचे खैराती खर्चास ह्मणून मळंगाउचा मुलुक रुपयाचा व कोवीलडीचा किल्ला हीं दिल्हें. तैसें विजयरघुनाथराय तोंडमानास प्रेषकषी माफ केलें नंदराज व मुरारजी घोरफडें याना त्रिचनापल्लीचीच आशा राखून नबाबाशी युत्धास प्रवर्तले तेव्हां ही तंजाउरचे महाराजानी नबाबास कुमक पाठविले थोडें दिवस युद्ध जाहलें त्या युत्धांत नदराजाकडील येक हात्ती पळून तंजाउरास येऊन पावला व नंदराजाकडील येक तोफ तंजाउरचे सरदारानी पडाउ घेऊन आले. तदनंतरें नबाबमहमदल्लीखानानी त्रिचनापल्ली किल्यांत इंग्रेजाचें ठाणें मजबुद ठेऊन