खेह आहे त्यास फार आहे त्याला त्यानेंही आपल्यास राखिनांत परंतू आपल्यास जिवंत महमदल्लीखानाशी वोपीनासें तुमचे हातानें मारून सोडा ह्मणून त्यास प्रार्थून येथें असून महमदल्लीखानाचे हाती वोपीले जाण्यापेक्षां तंजाउरकराचे हाती मारिले जाणें बर ह्मणून दृढ निश्चय करून अर्धरात्रीसमई कोणासही न कळविता येक घोड्यावरी स्वार होऊन येक खिजमतदार बरोबरी घेऊन असिरहस्मकडून तंजाउरचे लष्कर त्रिचनापल्लीचे पूर्वेस कावेरीस दक्षिणेकडे उतरले होते त्या लष्करांत येऊन सरदार मानाजीरायास रहस्येंकडून सांगून पाठविले तेव्हां मानाजीराव येकटच पलीकडे जाऊन चंदासाहेबासी भेटून बोलिलेजे तुह्मी कां आलां तुह्मास राखणें आमच्यानें के.गों विधकडूनही होणार नाहीं महाराज प्रतापसिंव्ह राजेसाहेबासही तुमच्याठाई राग फार आहे करितां तुह्मांस आह्मी राखूं शकता आतांहीं पाहिजे ते खर्चास देतों तुह्मी आपुले फौजेत जा तेथें जाणें मनास येईना तर खर्चासही देतो बरोबरी मनुष्यही विश्वासुक देता आतांच येथून निघुन जा दक्षिण प्रांती झाडी फार आहे तेथें जाऊन तेथून पलीकडे जाणेस मन असलिया जडूये अथवा येथूनच वोडयार पाळेचे राणांत असून अलीकडें वेंटवल्ल त्रिजामलेचे झाडी वाटहीं जाउय्ये करितां तुह्मासी सुवले ते करा ह्मणाले त्य.स चंदासाहेबानी उत्तर दिल्हें जे हा अर्थ समग्रही जाणून आलों तुह्मी करावयाचा उपकार काय ह्मणीजे महदमल्ली खानाच्या हाती जीत वोपू नका तैशा प्रसंगांत तुमचे मनुष्यांकडून मारून टाका येवढें अभय द्या ह्मणून मागितले. तेव्हां मानाजीरायानी त्यांस जीत वोपीत नाहीं ह्मणून भरवसा. देऊन त्यास प्रत्येक स्थळ करून रहस्यानें वे जतनाईने हीं ठेऊन त्याक्षणीं तंजाउरास चालिलें पूर्वोत समग्रही विस्तार कडून लिहिले. त्यास प्रतापसिव्ह महाराजानी उत्तर दिल्हे जे या चंदासाहेबानें केल्या कृत्यास त्याला आह्मी राखीतांच नये तत्रापी शरण आल्या.परीते समग्र आठवास आणूनयें त्याला राखणेंच विहित करितां त्या चंदासाहेबास तंजाउरास