उत्तर दिशा हून या प्रांतास येऊन त्रिचनापल्लीचें राज्यही साधून तंजाऊर राजावरीहीं युद्ध करून शेवटी रघोजी भोसले, व फत्तेसिंगाच्या हाती सांपडून पुणें प्रांतास जाऊन शाहुराजाकडून गडप्रवेश पावल्यानंतरें, त्याच्या संगतीस होता। तो महम्मद अरब म्हण्णार थोर सरदार दोनतीने हजार स्वार, पांच हत्ती, थोडे बारही इतुक्या फौजेनिशी उघडून कोणाच्या आश्रयांतही राव्हनासें आपण फूट होऊन पुदचेत फराशीसाचा आस्त्रा थोडा करून घेऊन मुलुकांत तमाम लुटणें, रात्री वडेरपाळ्याचे राणांत दबऊन राहणें, असें बहुतदा केल्यामुळें तंजाऊरचा मुलुक व त्रिचनापल्लीचाहीं केवळ तो राजी, त्याला तेव्हां प्रतापसिंव्ह राजानी आपले किल्लेदार मल्हारजी गाडेराव या समागमें मानाजीराव जगथाप यांसहीं कित्येक सन्नहा देऊन पाठविले। त्यानीं येक महिनापावेतो त्याचे पाठशी फिरून शेवटीं त्रिकाटपल्ली म्हणावयाचे किल्याजवळी त्या महंमद अबास सांपडऊन त्याचे हत्ती घोडे हिरून घेऊन त्याकडील जुलुफकवरखान् म्हणावयाचे बिरुदाचे निशानासहींत, कित्येक त्याची बिरुदेंहीं हिरून घेऊन त्याकडील बहुत लोकांसमवेत त्या महंमद अरवासहीं मारून टाकिले। प्रतापसिंव्ह राजानीं संतोष पाऊन त्याकडील बिरुदें समग्र मल्लरजीगांडेरयास कित्येक व मानाजीरायासही थोडी दिल्ही । दिवी कोटचा किल्ला साधणेंचा हेतूनें इंगरीजची फौज कित्येक येऊन दिवीकोटबंदरचा किल्ला साधिला । तरी महाराजास इंगरेजासहीं विगाड नसतां त्यानी येण्यास कारण काय ह्मणजे, दिवीकोटचे तोरेस इंग्रजाकडील येक जाहज पडाऊ जाहली । त्यापैकीं कित्येक सामानें व येक दोनी कुतरी महाराजानी ठेऊन घेतल्या करिता त्या विषई इंगरीजास ते बंदर आपल्यास पाहिजे ह्मणावयाचा हेतू बरूर येऊन घेतले। तेव्हां महाराजानीं फौजदार नानाजी रायास बरोबरी फौज देऊन पाठऊन परतून दिवाकोटचा किल्ला युत्ध करून घेतला । तेव्हां दिवीकोटचा किल्यांत महाराजाचे हुकुमाप्रमाणें जफरसाहेब मण्णार किल्लेदारी देऊन ठेऊन आपण तंजाउरास येऊन पावले ।