परतून दुसरा कित्ता इंग्रजाची फौज दिवीकोटचे किल्यावरी आलि। तेव्ंहा महाराजानी कित्येक सरदारास फौजही देऊन त्यावरी पाठविले। त्या युत्ध प्रसंगी इंग्रजची फौज सोलदाज वगैरे यावर दलक कोल्लाडचे काठांशी उभे होते । तंजाऊरची फौज त्यांवरी जाणेस कोल्लड नदीचा कांठ बहूत उन्नत झाल्याकरितां, भलती कडें उत्तरणेंस घोडेस्वारास वाट नाहींसें पलीकडून वाटेनें उतरून येकाच मार्गांनें येणें पडिलें करितां त्या समेई नदीत फौज समग्र उतरून येते वेळेस इंग्रेजे याकडील लोकानीं मार धरिल्या करितां नदीच्या वाळामुळें घोडे खेळवणुकेस देखील नाहींसें झाल्या करितां कित्तेक स्वार जाया होऊन येक सरदार विरप्पा ह्मण्णार रणास आला । तदनंतरें इंग्रजानीं महाराजासी सलुक बोलून येक करारनामाही लिहून दिल्हे । त्यावरून दिर्वीकोटचा किल्ला इंग्रेजास दिल्हा, ते सन १७४९ इसवींत । तदनंतरें हैदराबादेत होते ते थोर्ले निजामशाजदीखान ह्मण्णारानी दक्षिण प्रांताचें वर्तमान ऐकणेंत चंदासाहेबानें दास्तलीखानाच्या लेंकास बदरअलीखान् वगै-यांस घेऊन फारशीचा स्नेहहीं करून त्याची. कुमकहीं घेऊन त्रिचनापलीचे राज्य साधिले । ते म-हाटे शाहूराजाकडील रवोजी भोंसले फत्तेशिंगानी जाऊन तंजाऊरचे राजाची कुमकेस्तव गेले । त्यानीं त्रिचनापली राज्यही घेऊन चंदासाहेबास धरून आणून गडावरी घातिले । हे समग्र ऐकून त्रिचनापल्लीवरी बाछाई निशान चढविले; ते आपण जिवंत असतांच उतरणें विहित नव्हे, म्हणून शाहुराजास आप्त भावेंकडून कागद पत्र लिहून त्याचे अनुमतेवरून ऐंशी हजार स्वारानिशीं स्वार होऊन त्रिचनापल्लीस पावले। त्रिचनापल्ली किल्ला मुराररायावरी राजकारण साहामहिने करून मुरारजी घोपरडी यांस कौलावरी बाहेर कहाडून त्रिचनापल्लीचा किल्ला व आर्काडीची सुभेदारीही अनवरदीखान् ह्मण्णार समागमे आले होते, त्यांचे स्वाधीन करून आपण हैदराबादेस निवून गेले। आर्काडसुभा व त्रिचनापल्लीचे राज्यासहीं अधिकारी अनवदींखान् जाहल्याकरितां त्याचे पुत्र मापुसखानानीं आर्काड सुभ्याच्या नात्यानें