फौजदारी व किल्लेदारी दोनी आपले स्वाधीन आहे, त्या करीतां तुह्मांस कोण्ही समोर होणार नाहीं ह्मणून कागद लिहून आप्त मनुष्याकडे देऊन रहस्यानें पाठविला ते त्या सैंदाचाच भाऊ सैंदकाशि ह्मण्णार या कागद पत्राच्या रहस्यांत होतो । करितां या कृतृमाची पूर्वी सुचना मात्र महाराजास कळविलेतें नव्हतां महाराजाची अंतरंग मनूष्य घेऊन त्यांजकडून सैंदानें लिहिला जिनस व कागद व कागद नेले मनुष्यासहीं धरून महाराजाकडे ओपिले । या रीतीची प्रबल साक्षी महाराजास पावल्यावरी महाराज अत्यंत आश्चर्य व अतिशय क्रोधासही वश्य होऊन आपल्या आप्त परिवार कित्येकांस मिळवून त्यांत मुख्य सरदार मल्हारजी गाडेराव महाराजाचे मेव्हणे, व अणपा शेटगे महाराजाचे मुख्य कार्यस्त, मानाजीराव जगथाप, महाराजाचे आप्त सरदार इत्यादिकांस आपली दृढ योचना व्यक्त कळऊन सैंदास मारणेचा निश्चय करून येक्या दिवशी आपल्या सरदारास व आप्त लोकांस येकंदर सन्नहानिशी येक्या स्थळीं दबऊन ठेऊन आपण येका ठिकाणी प्रत्येक बसून मोगलाकडील कित्येक कागद पत्रें पहावें लागताती म्हणून सैंदास बलाऊं पाठविलें । तेव्हां सैंदाच्या उन्मत्त दशेकरितां महाराजाची योचना कोणतीहीं कळनासें जाहल्यास्तव महाराजाकडून सात पांच बलावणी घेऊन महाराजापाशी येऊन पावला । तेव्हां सैंदाचे उन्मत्तदशेकरितां महाराजानी त्याशी येक क्षणभर उपचारानें बोलून लघुशंकेचें व्याजे करून आपण अन्यत्र महालास गेले । तेव्हां महाराजाचे पूर्व संकेताचे आर्त प्रमाणें त्या त्रिवर्ग सरदारानीही सैंदाकडील येक मनुष्यहीं सैंदाकडें नाहींसी बंदोबस्ती अगोदरीच करविले होते करितां चिल्लर मनुष्यास सैंदाकडें पाठऊन त्याला हालू देईनासें हातपाय बांधून अन्यत्र स्थळांस आणऊन त्याला परलोकगतीस पावविले ।। सर्वेच त्याच्या घरावरीहीं हल्ला करऊन पळाले ते जातां उरल्या शत्रु शल्य नाहीसे केलें । तदनंतरें महाराजानी अणापा शेटग्यास सैंदखला व फौजदारी; मल्हारगाडेरायास किल्लेदारी, डबीर;