नादोपंतास चिटनिशी येणें प्रमाणें अधिकार देऊन राज्यभार सुरक्षितकडून चालतें केलें । तदनंतरें महाराज श्री रामेश्वर यात्रेस सकळ सन्नहानिशी जाऊन यात्रा करून बहुत दानधर्मही करून परतून येतेवेळेस रामनाथपूर नामरवर जमेदारानें परंपरेकडून महाराजाकडून आपले राज्य स्थापित ह्मणावयाचें कळ्याकरितां गांवभेंर भोय येऊन आपल्या किल्यास येऊन पाहून येक दिवस असून जावे म्हणून प्रार्थिले । तैसेंच महाराज अंगिकार करून गेले तेव्हां दरवाजांतील लोकानी न कळतां माघून येणार चिल्लरांस अटकाविले । ते महाराजास कळून तैसेंच परतून चालिले तेव्हां रामनाथपूरचें राज्य करणार बहुत भय बहुत विश्वास कडून दोन घटिकाची वाटपावेतो महाराजाची पालखी धरून घेऊन महाराजास बहुत प्रार्थिल्याकरितां, महाराज दयावंत होऊन परतून रामनाथपुरास जाऊन येक दिवस राहून त्याकडील पूजा पाऊन परतून आपल्या स्वराज्यास पावले । रामनाथपुरवाल्यानें अलीकडें नानाच्या दाक्षिण्यास्तव नवाबाचा म्हणविला तरीं आदि विसरनासें महाराजाची सेवा केली; पेसजी बावासाहेब राजाचे राज्यभारा शेवटीं चंदासाहेब म्हण्णार त्रिचनापल्लीचे किल्यावरी जाऊन उतरला म्हणावयाचें वरि लिहिलें आहे कीं त्या चंदासाहेबानें त्रिचनापल्लीचे राज्य साधून आपण तंजाऊरास प्रतापसिंव्ह महाराजास राज्य होतांच येऊन घेरिलें । तेव्हां प्रतापसिंव्ह राजे दोनी महीनेपावेतो चंदासाहेबासी चांगल युद्ध केले । त्यानंतरें चंदासाहेबानें याशी काय भांडणें हे किती दिवस काय खाऊन भांडतील, पाहुं; अपल्यासहीं त्रिचनापल्लीकडें पाळेगाराची बंदोबस्ती व्हावी लागतें, म्हणून आर्काडांतून बरोबरी आला तो सबदर अल्लीखानास तंजाऊरचें राज्य समग्र येक पटकोट सुभाविना जमा करून सबदरअल्लीखानाकडें वोपून आपण त्रिचनापल्लीस गेला । तदनंतरें सबदरअल्लीखान राज्य आपल्यास जिरेल किल्यांत असणार राज्य काय करून पहातील म्हणून खंदकाची बाली देखील अपली करून घेऊन तिरवादीस पश्चिमेकडे अपत्या नांवें खबरअल्ली आणा