परतून त्याला कैद करून प्रतापसिंव्ह महाराजास राज्य व्हावया जोगें हीं केलों । अगोदरी बावासाहेब राजानी ठेविले सरखिल सिधोजी वगै-यास काठ राजाकडून चित्रवध करविलो । आणखी चिंतलों ते करूं सकेन म्हणावयावेंयाचे उन्मत्ततेन अपली लेंके चंदासाहेबाच्या लेंकास देऊस त्या चंदासाहेबाचे लेंकास तंजाउरचे राज्याचे तक्तावरी बसऊन सकळ ऐश्वर्य हीं आपण भोगावें म्हणावयाची दृढ योचना करून अपला भाऊ सैंद काशिमासी तजवीज केला । ते या भोंसल वंशाच्या पुण्य प्रभावें कडून हीं व प्रतापसिंव्ह महराजाचे योगेंकडूनही त्या सैंद काशिमास आपल्या भावानें केला राजद्रोह स्वामीद्रोह विश्वास घातक हे समग्र साहिनासें अंतरंगें महाराजास त्या सैंदाचे कृतृम येकंदर त्याचा भाऊ सैंद काशिमानें जाणतें केलें । तेव्हां प्रतापसिंव्हमहाराज येकायेकी उचंबळनासे दूरवर योचना करून त्या सैंद काशिमास तुझ्या सांगण्याचें प्रमाणें काय ह्यणून विचारलें । त्या सैंदकाशिमान थोड्याच दिवसांत माझ्या सांगण्याचे निदर्शन महाराजास येईल, ह्मणून निरोप घेऊन घरास गेला । सवेंच चार पांच दिवसानंतरें सैंदानें तबक मुस्तीद करून महाराजापासी ठेऊन अपली मूले चंदासाहेबाच्या लेकांस देतों । तेणेंकडून संस्तानास बळच आहे, ह्मणून अर्ज केला । तेव्हां महाराजानी वळखून आमच्या राज्यास बळें व्हावी ह्मणून अपली लेंके देखील नवाइतास देताहेत ह्यणून श्लाघ्यता करून पाहिजे ते लग्नाचे खर्चास देऊन लग्न मात्र किल्यांत करणें गरज नाहीं, मध्यार्जुनी करणें ह्मणून भल्यापणानें सैंदास सांगीतलें । तेव्हां सैंदानें कबूल करून परतून किल्यास येऊन पावल्या नंतरें त्या सैंदानें केलें कृतृम काय ह्मणिजे, चंदासाहेब प्रभृतीस तुझी मध्यार्जूनांतून रातोरात निघून अरुणोदयकाळीं किल्यास पावणें; त्या वेळेस दंडका प्रमाणें किल्याचे दरवाजे उघडतांच फौजेनिशी किल्यांत शिरून राजग्रहावरी हल्ला करून आत शिरून खतल करून राज्य स्वाधीन करून घेणे ।