काट राजा कुप्पी बटकीचा लेंक त्याच नावें सुभान्या । तैशास तंजाउर राज्य परंपरेनें भोंसल वंशाचे राजे राज्याधिपत्य करीत आले; तेंशा राज्यास बटकीचा लोंक सुभान्या म्हण्णार अधिपति जाहला मण्णाराचे सकळ सोयरेधायरे व सकळजणासहीं व्यक्त जाहल्यावरि ह्या कृतृमांत मिळाल्या सौदान परंपरेनें राजवंशाची चाकरीत आलों कीं, ह्मणावयाचे लोक लज्जेस्तवहीं आणखी यांत मुख्य येंकोजी राजाचे परिग्रहीत स्त्रिया पासुन जाहले चंद्रभानजी भोंसले यांचे लेंक नायकजी भोंसले भाग्येंकडूनहीं शौर्येंकडूनहीं प्रख्यात होते । त्यांच्या भयास्तवहीं प्रस्तूत राजवंशी नामें प्रतापसिंव्ह महाराज रूप गुण कृयाबुत्धी या सर्व गुणाकडूनहीं योग्य आहेत; ह्मणून प्रतापसिंव्ह महाराजास तक्तनिशी केल्यावरीहीं तो सैंद कृतृमांतच होता । याखेरीज त्या सैंदाने अकृत्यहीं करीत आला; ते काय ह्मणिजे, प्रथम येंकोजी महाराज या तंजाउर राज्यास अधिपती जाहल्यावरी या अगोदरी केले धर्म न होता तंजाऊर राज्यांत बहुत देवालया कावेरीतीरी, बहूत ब्राम्हण वसताती, ह्मणून अग्रहार बांधवणें, व देवालय बांधवणें, ब्राम्हणांस सर्व मान देणें, यज्ञादिक करणें, अन्नछत्र घालविणें या रीतीचे अनेक धर्म येंकोजी महाराजापासून परंपरेनें इत्यादिधर्मे करितच आले । त्यांत प्रतापसिंव्ह महाराज तक्तास आल्यापासून विशेष धर्मे करितच आले । या धर्मास येकंदर सैंद विरोधच करीत आला । या खेरीज आपण जातीय तुरूक होऊन कर्नाट जातीच्याही सुळ्या देवालयांत असणार या नावल्या त्यांत येक मोहना मण्णार सुळीसहीं भ्रष्ट करून आपले घरी देखील ठेऊन घेतलें । इत्यादि त्यांची दुष्ट कृत्य व कृतृमें महाराजास प्रतिपदीहीं कळें असून हीं आपण नूतन राज्य पदाधिथित जाहलो ह्मणून हीं त्या सैंदास दंडिनासें कित्येक दिवस त्याचा अधिकार हीं चालविला । तरीही तो सैंद आपल्याकडें राजाचा फौजदारी व तंजाउर कोटाची किल्लेदारी व राजाची चिटूनीसी ऐसें प्रबल उद्योग संग्रही आपले स्वाधी आहेत, या अधिकाराचा बळेकडूनच माग बटकीचा लेंक सुभान्यास राज्य दिल्हों,