किल्यांत शरफोजीराजे राज्यभार करीत असतां त्याच्या पट्टस्त्रिया तीघा पैकी दुसरी स्त्री अपरूपबाईसाहेब यांसी कित्तेक दुष्ट स्त्रियानीं बोधिले जे, कनिष्ट भावास संतती वाहडली जेष्ट भाऊ राज्य करणारास संतती नाहीं, त्या करितां राज्यपट्ट कनिष्टास लागेले कीं म्हणून बोधिले । बोध रुचून त्या राजस्त्रियेनें प्रथम बोधिल्या दुष्ट स्त्रियानीं सांगीतल्या यत्नाप्रमाणेंच नसतां येक गर्भ म्हणून बाहेर रंग करून उपरि पुत्र प्राप्तीही झाली, म्हणून वर्तमान सांगितल्यावरून राजे व बंधु वर्गानीही संतोष मानून राजपुत्रास करावयाचा उत्सव करून त्या पुत्रास बाईशहाजी राजे म्हणून नामकरणही केले । तदुपरी थोड्याच दिवसांत चालिलें कृतृम राजबंधु तुकोजी राजे महादेव पट्टणांत होते, त्याकडून व्यक्त बाहेर पडून शरफोजीराजानी फार आश्चिर्य करून त्या पुत्राचा परिहार करावयाचे रीतीनें करून सोडिले । तरि नष्ट जाहल्या पुत्रांची कथा कां लिहावी म्हणा; त्या पुढें याचे कारणें सांगणें पडतें करितां लिहिलें । हे कृत्य येकंदर चालिले ते तीघे राजस्त्रियापैकीं अपरुपबाईसाहेब मण्णारानी दुष्ट स्त्रियेचे बोधने सवश होऊन केले । त्या उपरि शरफोजीराजानी कित्येक दिवस राज्यकारभार करून शकें १६४९ कीलक संवत्सरीं दैवगतीस पावले । त्या बरोबरी अमरूपबाईसाहेबाखेरीज सुलक्षणाबाईसाहेब, व राजसबाईसाहेब उभयतांहीं अनुगमन केले। सवेंच त्यांचे भाऊ धाकुटे तुकोजी राजे महादेव पट्टणांतून येऊन तक्तनिशी जाहले। त्यानी राज्यभार करीत असतांच वरि लिहिलें त्याच्या राखिच्या संबंधानं तीघे पुत्र नष्ट जाहले; परंतु नानासाहेब मण्णाराचे संततीन अण्णुसाहेब मात्र आहेत म्हणून वरि लिहिला अर्थ कारणानुसार लिहिला; परंतू याचे राज्यातच चालतो तेव्हां त्रिचनापल्लींत मीनाक्षीअम्मा म्हणून नायडाची राज्यभार करीत होती. तिला पाळेगार वगैरे कारभारामुळें बहुत शल्य जाहलें त्यास तुकोजी राजानी आपल्याकडील सैन्य व सेनापतीसही पाठऊन ते सैन्य येकंदर परिहार करून मीनाक्षीअम्मास निश्शल्य करून स्थापना केले. तदनंतरें तुकाजी राजे बहुत न्यायनीतीकडून चांगल्या रीतीनें राज्य करून शके १६५८. नल संवत्सरी दैवगतीस पावले.