सवेंच त्यांचे जेष्ट पुत्र पांचवे येकोजी राजे त्यास बाबासाहेब म्हणून ही नावें । त्यांनी येक वर्ष राज्यभार करण्यांत त्यानी समीपचे त्या कोणावरीही पत्यारा नाहीं, कोणाची माजी कठार असल्यानाहीं, कोणाच्या हाती सुरी असल्यांनाही, फार संशय मानणें, कोणी बिदिस जाणार येणार देखील कांही देवाची नामोच्चार केला अथवा त्यांचा होट हलूं लागला, अथवा येकीकडे दोघे मिळून कांहीं बोलूं लागले, कोणाच्या हाती जपमाळ पाहिली तरीहीं त्यांच्या ठांई अपल्यास वश करण्यास आपल्यास मारण्यास मंत्र यंत्र करिताहेत म्हणून निश्चय कडून समजून समजून त्यांच्या पारपत्यासही करवणें । आणखी राजाचे समीपतेचेहि चर्चा कर्ण्यानें थोर कीं त्यानीं समग्र आपली लेंकरें म्हणून जे म्हणतील, त्यांस नीट चालवणें; वरकडांस समीप नाहीं नाहीं चालवणेंही । तदनुसारेंच येणेंप्रमाणें राज्यभार करण्यांत चंद्रासाहेब म्हणून कोणी नवाईत सरदार अर्काटसुंभ्याचा दोस्तरीखानाचा जावई त्या चंदासाहेबाने कित्येक भारी फौज व फटाशीसाकडील हीं कुमक घेउन तंजाऊरावरि युद्धास आला । तेव्हां बाबासाहेबराजे उपद्रवाने असक्त होते तेव्हां हा किल्ला व आपले फौजेची बंदोबस्तीही चांगली करून आपण किल्याचे बुरुजावरी येऊन किल्यावरील तोफांचाही मार करून फौजेसही त्याचे फौजेवरी जाऊन पडणेंस निरोप देऊन चांगल मांडण भांडलें । तेव्हा चंदासाहेबांस किल्ला घेणेस निर्वाह नाहीसें, कांही पेक्याची बोली वारून घेऊन त्रिचिनापल्ली निघून गेला । तदनंतरें बाबासाहेब राजे त्याचे उपद्रवानें शके १६५८ पिंगळ संवत्सरी दैवगतीस पावले । तेव्हां अमात्यपण करणार, व योग्य सोय-यानीही, राज्यास कोण्ही नाहीं कीं म्हणून त्या बाबासाहेबाची स्त्री सुजानबाईसाहेबास सवेंच तक्तनिशीने केले तेव्हां शके १६५८ पिंगळ संवत्सरान बाकी कालयुक्ती संवत्सर देखील त्या सुजानबाईसाहेबानी राज्यभार करीत असतां, सोय-यापैकीं कौमाजी घाटके म्हण्णार येकानें पेसजी शरफोजी राजे राज्यभार करीत असतां,