पहिली सुजानबाई इंगळ्याची लेके येक, दुसरी बाईको जयंतिबाईसाहेब येक, तिसरी सखवारबाईसाहेब येक, चौथी सुकुमारबाईसाहेब येक, पांचवी गिरिजाबाईसाहेब येक, साहवी पार्वतीबाईसाहेब हे सहा स्त्रिया लग्नाच्यापैकीं वडीलानीं लग्न केल्या त्या येक दोनी जातां वरकड त्यांच्या प्रौढेंत करून घेतल्या; तैशाच राख्या तीनी तैसेच तुकोजी राजाचे दुसरे लेक राखेसंबंधानें मराठ्याचे जातीचे राखीचे पोटी जन्मले प्रतापसिंव्ह राजास लग्न केल्या स्त्रिया पांच | पहिली अहल्याबाईसाहेब मोहित्याची येक, यमराई मरहोवशी त्याची एक, सखवारबाईसाहेब मोहित्याची, द्रौपदिबाईसाहेब दुनगीची येक, यशवंतबाईसाहेब महाडीकाची येकून पांच स्त्रियापैकीं वडिलानी लग्न केल्या त्या एक दोन जातां वरकड त्यांच्या तखीतांत करून घेतल्या त्या । या खेरीज राख्या महाराण्या व नायक कुटाच्या बलजेवाराच्या देखील सात । प्रतापसिंव्ह राजाची बहीणें शामाबाई म्हणून वरी लिहिलें आहे। त्या शामाबाईसच मल्लादिगाडेरायास लग्न करूं दिल्हें । आता उरल्या तुकोजी राजाच्या नायडाच्या जातीच्या पांच राख्यापासून जन्मले पुत्र तिवेहीं तुकोजी राजासमोर देवगतीस पावल्यापैकीं नानाहेब म्हणणारास मात्र अपुसाहे म्हणून येक पुत्र । त्यांनीं वराड केल्या स्त्रियापासून जाहले होते । त्या अपुसाहेबास लग्न केल्या बाईका खेरीज बलजेवार वगैरे जातीचे राखीपासून येक पुत्र नानासाहेब म्हणून जाहला तो अद्याप सुखरुप आहे । अतां त्याच राखीचे संघांत जाहल्या दोघी लेंकीहीं तदनुसार गाडेकूटास दिल्हा । येणेंप्रमाणें खतनिशीजे शरफोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ संततीवंत तुकोजीराजे उभयतांनीं येकत्र राज्यभार करीत असतां उभयंतां भावास ग्रहकृत्य वैषम्यामुळें तुकोजी राजानी कांही मुलुक वडील भावापासी माघून घेऊंन महादेव पट्टणांत शहर वसऊन आपल्या सकल संसारानिशी महादेव पट्टणांत राहिलें होतें ।