तेव्हां आपुल्या राज्या पावेतो येऊं देईनासें परभारेंच वारून विजापुरचे पादाशहासीही सलूक राखून पेषकपीहीं येक मार्गे कडून वारून घेऊन राज्यभार करीत असतां त्यांचे तिसरे भाऊ तुकोजी राजे यांस शकें १६ १७ धातुसंवत्सर पांचवे येकोजी राजे जन्मले । त्यांस प्रतिनाव बाबासाहेब राजे ह्मणावयाचे रुछीही पडली । तदनंतरें शहाजी राजे चांगल्या नीतीनें बहुत दिवस राज्यभार करून शकें १६ ३३ नंदन संवत्सरी परमपदास पावले । संवेचे त्याचे दुसरे भाऊ तिसरे शरफोजी राजे तक्तनिशी जाहले त्या शरफोजी राजास पहिली स्त्री घाटक्याची लेंक सुलक्षणाबाईसाहेब, दुसरी स्त्री घाटक्याची लेके अपरुपबाईसाहेब तिसरी स्त्री शिरक्याची लेंके राजसबाईसाहेब या समवेत राज्यकारभार करण्यांत न्यायास न सोडितां परम नीतीनें राज्यकारभार करी। त्या दिवसांत अवरंगजबानी विजापुरचे अल्लीयदल्शाहास दस्तगीर केल्यामुळें त्यांस घात उद्भवत्या कलापाचा धका आपल्या राज्यास लागू देईनासें विजापुरांतून उघडून आल्या मातबराचा आदर करून राज्यकारभार करीत असतां, त्यांचे धाकुटे भाऊ तुकोजी राजानी लग्न केले । स्त्रीया, १ आरणाबाई मोहीत्याची, १ रामकुमार बाई इंगळ्याची, १ मोहनाबाई पिंगल्याची, १ लक्षुंबाई इंगळ्याची, येकून लग्नाच्या स्त्रिया पांच या खेरीज राण्या साहा पैकीं येक मात्र ह्मराट्या जातीची; वरकट पांचहीं नायडकूटाच्या । त्या ह्मराट्याचे जातीची तरवारी लग्न केलें ते राखे अन्नपूर्णाबाईचे पोटी शक १६ ६ ४ शार्वरी संवत्सरी प्रतापसिंव्ह राजे जन्मले । सवेच शामाबाई ह्मणून येक कन्या जाहली । वरकट नायडकुटाच्या राख्या पांचा पैकी जाहली संतती, मालोजी राजे येक, अण्णासाहेब राजे येक त्यास दुसरे नाम हरीचंद्रराजे, नानासाहेबराजे येक कन्यादोघी । येणेंप्रमाणें जन्मलें त्या उपरी शरफोजीराजाचे राज्यांतच त्यांचे धाकुटे भाऊ तुकोजी राजाचे लग्न केलें स्त्रीचे पुत्र पांचवे येकोजीराजे प्रतिनाव बाबासाहेब ह्मणून वार लिहिलें आहे त्यांस लग्न केल्या स्त्रीया,