खादर येकखलास व अबदुलहलीम् उभयतां वजीरास अपल्यापासीच राहून घेतल्या करितां त्यांच्या न येण्यावरून बाछाई विमनस्क होइनासे युक्तीनें कागद पत्र लिहून पाठविले । ते पाहून अल्लीयदल्शहा फार संतोष मानू न येंकोजीमहाराजास वस्त्रेंपात्रें पाठविण्यासरिसें हे तंजाउरचें राज्य येंकोजी महाराजास त्यांचे वंशपरंपरेनें अनुभोगणेसही सानके दिल्हे, असें ह्मणून लिहून पाठविले। तदनंतरें त्रिचनापल्लीचे नायडानी येंकोजी राजावरी राजकारण केल्यास राजे मजकूरानि युत्ध करून त्यांस दाटा देऊन त्यांकडून संदलीं महाल पानसुपारीस ह्मणून लिहून घेउन, खादरयेकखलास व अबदलहलीम् । उभयतांसहीं त्यासी बोलल्या मर्यादे प्रमाणें चालवीत राज्य करूं लागले। उपरी शकें १५९८ पिंगळ संवत्सरी राजास तिसरे पुत्र तुकोराजे जन्मले । हे तिघे पुत्रही येकोजी राजाची थोरली स्त्री इंगळ्याची लेंकेय दीपाबाई साहेब यांचे उदरी जन्मले । त्यांची धाकुटी स्त्री मोहित्या. ची लेके अण्णुबाईसाहेब त्यांस येक लेके; या खेरीज त्यास परिग्रहित स्त्रीया नऊ त्यांत जन्मले ते। चंद्रभान, सूर्यभान, मित्रभान, कळेभान, कीर्तीभान, विजयभान, उदयभाय ऐसें सांत लेक जन्मले; पैकीं जेष्ट चंद्रभान शूर जाहले । येकून येंकोजी राजास पुत्र १० । तदनंतरें कित्येक दिवस न्याये कडून राज्य परिपालन करून शकें १६०४ रुधिरोद्गारी संवत्सरी येंकोजी राजे यांसी परम पदवी प्राप्ती जाहली । सवेंच ज्येष्ट पुत्र तिसरे शाहाजी राजे तक्तनिशी जाहले। त्या शाहाजी राजास भार्या, चिमाबाई साहेब मण्णार येकच परिग्रहित स्त्रीया उदंड होत्या । त्या शाहाजी राजानी धाकुट्या वयांत प्राप्त जाहले राज्य आपल्या बुत्धिवैभवे कडून आपले धाकुटे भाऊ शरफोजीराजे व तुकोजी राजे, उभयतांसव अपल्या सही यथाकाळी लग्नमुहूर्तही करून आपले मातोश्री दीपाबाई आउसाहेब यांचे अनुमतीनें सकळ जनास सौख्य व्हावें, यांजोगें आपुला फौज व खजाना बहाडऊन राज्यकरीत येण्यांत मुल्लायाकलाप ह्मणून येक फितायजुलुफकराचा कलाप येक किता ऐशे कलाप आले;