आपल्याच कडेवर वेऊन लेंकीचे महालास जाऊन मायें तुझे लेंकरास घे ह्मणून हाती दिल्हें । तेव्हां त्या ब्यंगमास परमसंतोष होऊन अपल्या सर्व सौख्याचें कारणें हेच लेंकरू ह्मणावयाचा निश्चय मानून त्या लेंकरास त्याच्या हिंदुधर्मास तीलप्रमाणही हानि न येतां सर्वविधसंरक्षणासरिसें विद्याभ्यासहीं करविलें । शाहुराजास चंद्रवृद्धिसाखिवें विद्याभ्यासपरिपुतींस बारावर्ष वयहीं जाहलें, तेव्हां त्या ब्यंगमान आपल्या लेंकाचे रूप आणि वय व विद्या व सौजन्यता इत्यादि योग्य एैशी सर्व उपपत्तीहीं पाहून, त्याचे लग्नाचें हव्यासास मनें प्रवर्तून वाछायास विनविलें । तेव्हा बाछायानी येथायोग लग्नाचे सर्चासही देऊन त्याचे लग्नही करऊन नवरा नवरीं दोघासही घेऊन या ह्मणऊन निरापिले, तदनुसारच शाहु राजास जाधवाची कन्या सखवारबाईस लग्न करून दिल्यावरी नवरा नवरीस बाछायापासी पाठवितें वेळेस, सोयरे वगै-यानी उदंड बाछायी जाहले, तरीहीं यवन जातीची शंका धरून त्या सखवारबाईसाहेबास न पाठवितां, त्या स्थानाल वीरू ह्मणणारी दासीस निष्कर्ष कडून पाठविले । तेव्हां बाछायानो उभयतां नवरा नवरीस दोनी मांड्याधरोही बसऊन पाहतेवळेस नवरीचे ठाई कृतृमता भासूनहीं आपल्या मांडीवरी बसविल्याकरितां, हे बायकोच या शाहुराजाचे सकळ भाग्यही अनुभवील ह्मणून उभयताच्या मस्तकास हस्तस्पर्श करून उभयतांस सकला. भरण भूषित करून, शाहूराजाचे पितृपितामहानी सपादिलेले राज्य समग्र ही राजे मजकूरास साडून त्यांचे स्वस्थानास निरोप देते समयी ब्यंगमान विनविलें जे, शाहूचे बाईस दिल्हें परंतूं माझे कांहीच माझा लेंक शाहूस पावलें नाही ह्मणाली । ते बाछायानी ऐकून विहीतच माझ्या भाग्यास माझे तीघे लेंक जैसें विभागी तैसीच चौथी कन्या करितां इचा भाग चौथा तिच्या लेंकास पावावा, ह्मणून जेथें जेथें बाछायाची आमदानी असेल तेथें सभग्रही शाहू राजाची चौथाई ह्मणून चौथाईचे परमान करून देऊन शाहू राजास पुने प्रांतास पाठविलें ।