खालींल येकासच द्यावें संभाजी राजा तेसा नव्हे । तुह्मासी बरोबरीचा दावा राखून तुह्मास सलां करिना ह्मणाल्या जोगें शोर्य राखिला । तो या खेरीज बहूत देशाधिपती राजे अशानें माझी आशा धरून मागितल्यावरी यापेक्षा अधीक कोणास तुह्मी पाहिलां आहां याखेरीज अमच्या मतामधे तुरुक होतो ह्मणून कबूल जाहल्यांही त्यानें न मागण्याचें मागीतल्यांहीं देऊनच त्याला तुरुक करणें हा माप जाहल्या करितां उभयपक्षीहीं चुकलें याऊपरी म्यां जरी भलत्या येकास लग्न करून घेऊन किती दिवस वांचणें आहे । मुख्य कीर्तीच राखावी यास्तव जे मजवरी मोहून जीवास उदार जाहले कीं त्यांकरितां रांडपण भोगणेंच मला स्वधर्म परंतूं संभाजी राजाविना इतर पुरुषासी संभाषण अपल्यास व्यभिचार ह्मणून मानिलें ह्मणून साफ सांगीतल्यावरून बाक्षाई व्यसनस्त होऊन ईश्वर अपल्या पोटी तीघे लेंकाचे पाठीशी येक कन्या दिल्हीं तीचा संसार निःसार जाहला। याखेरीज तिनें दोनें कारणें सांगून अपला निश्चयहीं सांगीतला । ते प्रपंच परमार्थास युक्त बोलणें बोलिली परंतूं अपल्यास क्रोबाने वंचिल्या करितां क्षेमे यवढें थोर नाही ह्मणून ग्रंथांतर बोलताती ते खरच ह्मणून आपल्या जिंव्हारी खोंचून याऊपरी त्या लेंकराच्या मनास कोणें रीती सौख्य देऊन पाहतो ह्मणावयाच्या व्यसनानें संभाजी राजाचे भाग्यास योग्य अधिपती कोणी आहे काये परामर्श करून असेल त्यास आणऊन सोडा ह्मणून आज्ञापिले । त्यावरून सातार पुने प्रांती बाछायाकडील्यानीं विचारणा करूं लागले । तेव्हां संभाजीराजास धरून नेते वेळेंस त्याचे उदरी गुणरत्न ऐशे कुलदीपक शाहुराजे शक १६१५ भवासंत्वसरी जन्म पाऊन तीने वर्षाचे होते । परंतूं त्याचा लाग लाऊं देईनासें तदीयानी बाछायाचे भयास्तव दबविले त्यास परतून बाछायाकडून प्रमाण पूवर्क अभय पावल्याकरितां येतद्विषर्ईेचे शोधणेस आले होते । ते कार्यस्थासमागमें लेंकराच्या पक्षपात्यानी शाहुराजे लेंकरास घेऊन दिल्लीत पाऊन अवरंगजब बाछायापाशी सोडिले । तेव्हां वा....नी हर्ष व खेद येक काळीच पाऊन शाहुराजस