बसून बाहेरी येऊन आपल्या राज्यास पाऊन राज्य करीत होते । ते कैदेतून तुकले ह्मणावयाचें अवरंगजबास कळून सैन्य पाठऊन संभाजीराजास धरून आणा ह्मणून निरोपिले। ते फौज राजावरी युत्धास आली, तेव्हां संभाजीराजानीं युत्ध करून आलिसेना व सेनानायकास हत करून पळविले हत शेनानी जाऊन बाक्षायास जाणविल्यावरी परतून बाक्षायानी भूरा शीसनातोसच सेनानायक वजीरासही पाठविले । त्यानी येऊन संभाजी राजासी कांहीं युत्ध कांहीं कृतृम येकीकडून संभाजीराजास धरून ने ऊन बाछायापासी सोडिले । बाक्षायानी संभाजी राजास पाहुन लऊन खुरनिशी करा सोडितों ह्मणाले, तेव्हां संभाजीराजांनी "अता आह्मी तुमच्या हाती सापडल्यासारिखें, तुह्मी सांपडते तर कळो येतें” ह्मणाले। अवरंगजबास राग येऊन पुन्हांहीं कैदेंत ठेविले । थोडे दिवस गेल्यावरी संभाजीराजानी लवावें ह्मणून येकीकडे लहान दरवाजा करून संभाजीराजास त्या वाटेनें भेटीस बोलाविलें । तेव्हां राजे मजकूर पुढें पाय सोडून आले । ते पाहून बाछायानी संतोष मानून हा केवळ शूर आहे याला मारू नये ह्मणून तुह्मी तुरुक व्हा तुह्मास सोडून देतों ह्मणाले ।तेव्हां संभाजी राजांनी “तुमची लेंक कन्या आहे, तिला द्या तुरूक होतों” ह्मणाले । तो शद्ध कठोर वाटून बाछायानी मारून टाकणेस हुकुम दिल्हे, तेणेंप्रमाणें मारून टाकिले। तेव्हां शक १६१८ ईश्वर संवत्सर । हें वर्तमान बाछायाची लेंके उपवर होती तिला कळून येवढा थोर बरोबरीचा राजा भयें धरीनासें, माझी अपेक्षा धरून जीवानिशी गेले , मी तशा शूराचीच स्त्री, त्या वेगळा पुरुषमात्र माझा पुत्र अथवा पिता भ्राता ह्मणून निश्चय करून यवन सांप्रदायाप्रमाणे दाक्षणी लाविली तुरुंकांतील संकेत कन्यापणी दाक्षणा लावणें नाहीं लग्न जाहल्हाऊपरी लावणें करिती । लेंकीनें दाक्षणा लाविलें वर्तमान बाक्षाईस कळून लेंकीस पाहून हे काय केलीस ह्मणून विचारल्यास, म्यां केलें ते उत्तमच केलें परंतूं तुह्मी दोनी गोष्टींचे स्मरण धरिले नाहींत काय ह्मणिजे तुह्मासारिख्याच्या पोटी जन्म जाइल्याउपरी मला तुह्मी तुह्मा