बलाऊन पाठविले । तेव्हां बापापासी पावले होते, त्यांस पन्हाळगड देऊन आपण शेतुयात्रेनिमित्त गुप्त मागेंकडून येऊन यात्रा सित्धी करून त्यांत येक कित्ता अगोदरी येकोंजीराजे तक्ती बसतांच राजे गुप्त मार्गे तंजाउरच्या किल्यांत येऊन किल्ला फिरून पाहून बाहेर जाऊन येकोंजी राजांस सांगून पाठविलें जे, तुह्मी संपादिलें राज्य समग्र आह्मी पाहिलें तुमचा किल्ला गरुडाद्री आहे । थोर किल्यास चारी बाजूस किल्ले आहेत, परंतु पुढें राखणें कठिण पडेल, याकरितां दक्षिणेकडील उपकिल्ला मात्र पाण्याचा आसपास आहे तेहडा किल्ला राखून वरकड पाडून साडणें । आह्मी किल्यांत आलो तेव्हां येका दुकानांत अमचा शिक्का टाकून शिरणी घेतली । तो शिक्का पाठवणें ह्मणून त्या दुकानची खूणहीं सांगून पाठवलें । तेणेंप्रमाणेंच तंजाउरी असणार दुराजानी विकले होते, तदनंतर येक कित्ता शेतुयात्राहीं करून स्वस्थळासी पावले । तदुपरी शिवाजीराजे दोघे पुत्रास राज्य नेमून सकळ पृथ्वीतहीं प्रख्यात नाम पाऊन सकळ शत्रूसही पराजय पावऊन निशल्य जाहल्यावरी जन्म घेतल्यास कृतकृत्यता कांहीं जाहले ह्मणून प्रपंच व राज्यपदवीचा परित्याग न करितां पारमार्थिक निवृत्ति मार्गानें ठांई मन प्रेरून तोच दृढभ्यास धरून श्रीगुरुवाक्याचें मननेंकडून निज ध्यासहीं जाहल्यादशांत परिपाप्तिचे दिवस ढकलून शाश्वत ऐशा स्वप दास आनंदरूप होऊन पावले। त्याउपरि संभाजीराजे पितृकीर्तीस विस्तार वीत राज्य परिपालन करीत असतां दिल्लीश्वर ऐसा अवरंगजबानी विक्रमेंकडून बावन्नवाळइताहीं साधून सर्वभौम नामें पाऊन सकळ देशाचे देशाधिपतीस भेटीस बलाऊन पाठविले । तेव्हां अवरंगाबाद ह्मणावयाचें स्थळ अवरंगजेबाकडून निगिजेलें त्या स्थळास सकळ देशांचे राजाबरोबरी संभाजीराजेहीं जाऊन पावले। तेव्हां सर्वत्रांनीं बाछायाचे भेटीस गेले। तेव्हां लऊन सकळही खुरनिशी केले । तैसें, संभाजीराजे खुरनिशी न करितां उभे राहिले, त्यावरून पादशाहास राग येऊन संभाजीराजास कैद करविले । त्याचे कैदेंत सहा चार महिने असून शिरणीचे पेटारांत