यांस कारण आहे उद्या पाहटे तुह्मास संविधान येईल ह्मणून सांगीतले । तैसें दुस-या दिवसी तंजाऊरांतून योग्यायोग्य चर्चामुळें येकास येक भेद पडून अमात्यपण करणारहीं बिगडून तिरमलवाडींत होते त्या येकोजीराजास हें राज्य परिपालन करावें ह्मणूत प्रार्थिलें । ईश्वर संकल्प टळतां नये ह्मणून अंगिकार करून येकोंजीराजे तंजावुर किल्ला प्रवेश केले । हे पूर्वोत्तर, पुढें विस्तारेंकडून तंजाउर प्रांती या राजवंशाचे राजे राहिले । ते प्रकरणे लिहिण्यांत लिहिले जातें । पुना प्रांती सकळ दिग्विजय करून राहिले शिवाजीराजे यांस अष्टनाईका त्यांची नावें. सौ. सईबाई लिंबाळकराची १, दुसरी काशीबाई जाधवाची १, तिसरी सक्वारबाई गायकवाडची १, पुतळाबाई पालकराची १, पांचवी सगुणाबाई शिरक्याची १, सोइरीबाई मोहित्याची लेंक , या अष्टनाईकासमवेंत शिवाजीराजे सुखें भोगीत असतां वडील सईबाईच्या पोटी तिघी कन्या येक पुत्र जन्मले। त्याचे मामे संभाजीराजे ह्मणून ठेविले । त्या संभाजी राजाचे जनन शक १५९८ पिंगळ संवत्छर, तिघी कन्या पैकीं प्रथम कन्या सखवारबाईस लिंबाळकराचे घरी दिल्हें । दुसरी कन्या राणूबाई जाधवाच्या घरी दिल्हे । तिसरी कन्या अंबिकाबाई महडीकाच्या घरी दिल्हे । त्या हरजी महडीकासच चंदीप्रांती कित्येक जाहगीरहीं दिल्हें। दुसरी स्त्री काशीबाईसाहेबास संततीच नाहीं । तिसरी स्त्री सखवारबाई साहेबांस कमलाबाई ह्मणून येक कन्या ते पालकर नेतोजीस दिल्हे । चौथी पुतळाबाईस संतती नाहीं । पांचवी सगुणाबाईस राजकुमाराबाई ह्मणून कन्या जाहली ते गणोजी शिरके यांस दिल्हे साहवी सोईराबाईस येक पुत्र जन्मले त्यांस राजारामराजे ह्मणून नावें ठेविले । दुसरी कन्या दादू बाई । तदनंतरें शिवाजीराजे यांनी आपले दोघे पुत्र संभाजीराजे जेष्टास शक १६ ०३ द्वंदभी संवत्सरी आपले स्वराज पुनप्रांताचें तक्त देऊन धाकटे पुत्र राजारामास प्रथम चंदीचें राज्य दिलें होतें । संवच महत्कार्यकडून पुनाप्रांत समग्र यवनाक्रांत झाल्या वेळेस राजाराम चंदीहून निवून तंजावूरचे किल्यांतहीं थोडे दिवस मावापासी असून उपरी शिवाजीराजाने