आपला नाम्ना अणखी कोणत्या रीतीनें प्रख्याते असावी ह्मणून योग्य डोंगर पाहिल्या ठाई येकंदर गड बांधवणेंस आरंभून मुख्य शिवगड व मंडणगड ऐशे तीनेशे साटी गड बांधिले । तदनंतरें शिवाजीराजानी आपले जेष्ट बंधु संभाजीराजांचे पुत्र उमाजीराजे, व संभाजीराजाच्या स्त्रिया जयंतीबाई येक, गौरीबाई येक, पार्वतीबाई येक, या तीघी मातोश्रीबाईसाहेब समवेत उमाजीराजे व त्यांची स्त्री सौ. सकूबाईसाहेब यांस समग्र राजपूर ह्मणावयाच्या राज्यांत ठेविले । तदुपरी कित्येक दिवसानंतरें उमाजी राजास सकूबाईपासून परसोजीराजे जन्म पावले, तदनंतरें शिवाजीराजास वडील सावत्र मातोश्री तुकाई आऊसाहेब यांचे उदरीं जन्म पावले येकोंजीमहाराज, यांस पेसजी शाहाजी राजानी येकोंजीराजे वडील, संतती करितां कु. सदैवत व अपली पहिलीलें विरुदें व अल्लीयदल्शाहानीं सदर बकशीस केले तेव्हां प्राप्त जाहली बिरदें दिल्हें होते । ते येकंदर बिरुदें देऊन, व घोड्यावरील अंबारीहीं येक देऊन, त्याच्या स्त्रियांस उंगदीपाबाई आऊ साहेब आदिकरून सौ. मातोश्री सईबाई येक, सौ. मातोश्री अनुबाई येक, या त्रीवर्गासहीं समागमें देऊन अपण आणखी कित्येक स्वार बार सन्नाह देऊन ब्यंगळूर राज्यास पाठविले । त्यानीं ब्यंगळूरीच राज्य करीत अस्तां शक १५९३ परिघावि संवत्सरी येकोंजीराजे यांचेपासून सौ. दीपाबाईसाहेब यांच्या उदरी प्रथम पुत्र तिसरे शहाजी राजे जन्म पावले । त्यासंधीत अल्लीयदलशाहानी तजवीज केली जे, शिवाजीराजे प्रबळ होऊन राज्य समग्र आटोपिले । त्यास खांले करावें ह्मणून अह्मी व अवरंगजबबाछा यानींहीं उदंडदायुत्ध करून उदंड प्रयत्न केल्यासही अटोपनासें गेलें । अतां येकोजी राजे व त्यांचे सावत्र माऊ ब्यंगळूरी पावले आहेत । करितां त्यासी संविधान करून आपले करून घेऊन दक्षिण प्रांतावरि तरी अपली सत्ता चालिजेसें करावी । नाहींतरीं शिवाजीराजे यांस बळे बांधून तेही आक्रमतील। अतांच आह्मीं येकोजी राजास आपलें केल्यानें शिवाजीराजेहीं आपले भाऊ स्वकर ह्मणून त्या वाटे जाईनात; ह्मणून तजविज करून येकोंजी राजास