त्यांचा सुतरत तरी लिहून आणून पाहावी ह्मणून योग्य ऐशा चिता-यास पाठविले । आपण तेथून कूच करून मुरडून स्वस्थळास पावले । त्या चिता-यानें येऊन बहुत दिवस समय पाहिला । परंतु राजाची रीत देश सांपण्याचे हायासाकरितां राहिला स्थळीं राहणें नाहीं । येका देशावरी जाताहेन ह्मणून राखून असते वेळेस पलीकडें येक प्रदेशी वीस गांवं तीस गांवें भोईवरी आहेत, ह्मणून अैकणें । तेथें जाऊन पावतारी आणखी कोठकी वर्तमान कळणें नाहीं । अशांत शिवाजीराजानी अमका देश बांधीला, अमके राज्य बांधीलें, अमकी ठाणे ठेपिले, पलीकडे अमक्या राजावरी चाले केले, ऐसे ऐकणें मात्रें, परंतू राजे दृष्टीपथास येईनात । ऐसे अनेक दिवस फिरत असतां, येक्या दिवशी मोहिमेचे वेळेस यावखलक अनेक पुढें ओडणें निवळ स्वार मात्र. तीन लक्ष स्वार जमावनिशीसी शिवाजीराजे राज्य साधण्याचें कार्योद्वेशेंकडून त्वरेनें जाणार, अशास त्या चिता-यानें पाहिलें तेव्हांचा अवसर, शिवाजीराजे भल्या घोड्यावरी स्वार होऊन शिरी मुंडास, माजान मानचोळणा, जोडे, छत्री पासोड्याची पचंगी वाछन, हातीचा भाला खांद्यावरी ठेऊन मस्तकानें दाबून घेऊन जोंधल्याचे शेतांत जाऊन हाती जोंवल्याचे कणीस घेऊन दोने हातानें ते कणस चोळून फकरा मारून त्याचा भूलटा घोड्याचे तोडात देत होते । तैशा अवसरांत चिता-यानें पाहून त्याच रीती सुरत लिहून नेऊन अवरंगजबापासी दिल्हा । ते पाहून आश्चर्य मानिले जे. शिवाजीराजांनी तीने लक्ष स्वाराचा सरदार श्रीमंत तसा राजा, कार्य साधणेच्या तात्पर्यास्तव येके ठांई उतरून न्याहारी करावयाच विलंबनांत कार्य नासून जाईल ह्मणूनही जवळील सरदार आपल्या मनोगतानुसार कार्य करणेस खोळंबतील ह्मणून ही जोंधल्याचे कणस चोळून खाऊन त्याचा भुलटा घोड्यासहीं चारिणा-या राजाच्या हुशार आणी प्रयासी राजा साजणार, कोणत्या विषईं प्रयास करणें व्यर्थ ह्मणऊन, दृढें मानून स्वस्थ राहिले। या राजा अनेक राज्य साधून अनेक द्रव्य संपादून ईश्वरप्रसादेंकडून अनेक निधी लाधून अमित द्रव्य जमा झाल्यावरी