भालकाठीचें आयुधहीं नूतन येक कल्पविलें । दुसरें अपण श्रीमंत होऊन दरयेक कामें आंगकडून प्रयासाचें हीं करणें, या खेरीज सकळ जनरंजक अतिशय बुत्धिवंत धैर्यवंत ही, राज्य करणाराची अंग, साम दान भेद दंड हीं चारी प्रयत्नहीं समय जाणून करणारे, आणि जे साधारणेंकडून कैशा प्रबळ कार्योतें हीं अतिश्रमेंकडून कार्य जाणूनहीं आणी करणारहीं, व परम नीतिवंतही, आणी दयावंतहीं, शरणागत संरक्षही नीट करितो । रूपौदार्य गुणें कडूनहीं पूर्ण आहे । या इतक्या गुणेंकडून हीं वरिष्ट आहे । ते मात्र नव्हें। ईश्वर वरप्रसादही येणेंकडून भलत्या ठांई अनेक निधी सांपडताती । शत्रुचा लाखो फौजामधे राजाकडील सैनिक स्वल्पजण जेथून 'हरहर महादेव' ह्मणून शह करून येऊन पडतांच परसैन्य समग्र वाताहत होऊन जातें। ऐशाराजास जिंतणें असाध्य; बरें स्नेहानें आप्त होऊं ह्मणालियां तेणेकडूंन अपल्यास लाघवहीं आहे। दुसरें तेव्हां प्रयास करितां या राजाच वाटे जाऊन रणें करून अपला फौजेचा व द्रव्याचा नाश न करितां उगाच आपले ठाई असणें बरें, ह्मणून अल्लीयदल्शाहा व अवरंगजबहीं अपले ठांई स्वस्थ राहिले । तेव्हां दिल्लेश्वर अैश अवरंगजबानी फौज सन्नहा करून शिवाजीराजावरी अपणच युत्धास जाणें ह्मणून निघाल्यासमंई आपले फौज समग्र शिवाजीराजाचे परक्रमेभयकडून मग्न आहेत । ही पाहून मनी कांहीं खिन्नशा व आपल्या फौजेवरी रागही धरून चाले करून जाते वेळेस येक्या प्रदेशी नदीत आपण बसल्या खांस घोड्यास आपणच अनालस करून पाणी पाजविले । तेव्हां तो घोडा येकदम पाणी पिऊन परतून दुपरेंद। पिणस तोंड पणयासमीप नेते समंई उसळून पाण्यास आलिकडें कांटावरी येऊन परतून पाण्याकडें पाहिनासें झाला । तेव्हां बाछाई वरी होते त्यानी सांभाळून बसून आपल्या घोड्यास पाहून "येथे हीं शिवाजी आला काय? कां घाबिरा झालास?” ह्मणून फौजेकडें पाहिलें तरी त्या फौजेचे चित्तही व्यग्र जाणून, तेथेंच मोकाम करून शिवाजी राजास जीत धरून पाहावें ह्मणून अनेक प्रयासें केलें । परंतू साध्य नाहत नाहीं करितां