रुप्पे पोलार शीसे तांबे लोखंड काळशीसे कांसे पश्चिम समुद्रांत सोन्याची वाळू होती ते मोती मरकत पद्मराग वज्रपोवळी लाख खडपात्रें शिंगचामरें शिखिग्रीव व चाक्षुषी व त्याविण हे तीनी वस्तु अजमइ बाल्हां कचरक लोध्रक गुगूळ पांयलाशक मंजिष्टा नागसंभव पारा हरिताल गंधा सामान नराळीगंधक गोरोचन अभ्रक वत्सनाभी आदिकरूनि विषवस्तु विषपरिहार औषधी जरी माल कापडें शालाचा जिनस, कापडें रेशमी जिनस कापडें तेहीं घेऊन बहुत नाजूक सामानें त्यां त्यां कडून घेऊन अपलें समस्त दुर्गात पारावांत ठेऊन तदनंतरें शटवल्लीच समदल व हरिचरिव नैखनाथ व कुतवट केला वल्लीक शवल्लीका व नाधवाट पासून धामनप्तावल बटक्षार पट्टण ऐसे देशाचे राजे राजाकडून करभार घेऊन सकल देशही स्ववश करूं घेऊन राजपुरांत होते ऐसें असतां यदलानें शिवाजी राजास कांहीं शल्य करणेस सूर्य राजास लिहून पाठविल्यावरून त्यानें संगमेश्वरास त्यांस रात्रीं रोधिलें । त्याला मल्लसूरानें सुसामथें अद्भुत युत्धकरून मारून पळविलें । सवेच शिवाजी राजे राजगडाहून संगमेश्वरास येताहेतसे वर्तमान ऐकून मल्लसूर प्रभृति राजे सन्मुखे येऊन दर्शन घेतले । तेव्हां नींलकंठराजाचे पुत्रानें तानजिताचे सामर्थ्ये महाराजास कळविले । ते ऐकून त्याला व सकळ लोकांस बहुत सन्मा करून सूर्यराजावरी राग क्षमा करून पुनश्च हारका-यासमागमें " अपण पल्लीवन प्रदेश घेण्यास जातो। तुं बहूत अपराधी जाहल्यांहीं क्षमाकरून तुजला नवीं भर वस' दिल्हा आहे शीघ्र सावध होऊनी राहणेसें” सांगून पाठविले । ते ऐकून अपण येतों हे सांगून पाठविले परंतूं न गेले। राजे पल्लीवनास जाऊन राज्य गड किल्ले सम.... अपले स्वाधीन आणून तेथीलं लोकांस अभय देऊन पूर्वीहून अधीक वस्ती वसऊन तेथें चिरदुर्गे ह्मणून येक पर्वत होता. त्यावरी येक नूतन प्राका.... बांदून मण्डतगड ह्मणून नावे ठेऊन तेथें समर्थ सायक अधिकारी नेमूण कांहीं सैन्यहीं तो प्रांत रक्षणार्थ ठेऊन श्रृंगारपुर घ्यावें ह्मणून राग.... पंधरा हजार सैन्यासहीत निघाले । पूर्वीच श्रृंगारपुर न घेतां सांप्रत राग.... |