कारतला खानास पाहून ह्या राणी दिल्लीश्वराचे सैन्य समग्र हत करणेस इछितोस, शिवाजी राजे तुजला जिवानिशी सोडत नाहींत त्यास्तव त्यासेंच शरण जाऊन येथून चुकून जाणें बरें, ह्मणतांच ते युक्तसें समजून कारतलब आपले हेजीबास राजासमीप पाठवून भरवसा घेऊन येथें आले होते । ते राजे समग्र आपले सर्वस्वहीं राजास देऊन, शास्ताखानाकडे निघून गेले । त्या नंतरें शिवाजी राजे फार संतोषानें शत्रूनें दिल्हें सकळ सैन्य व द्रव्य घेऊन, व आपला मंत्री नेतोजीसी तजवीज करून, पुनश्च ताम्रमुखाचे राज्य स्वाधीन करणें निमित्त, दालीयपुरास जाऊन तो देश स्ववश आणून पल्लीवन प्रांतास गेले । त्या देशाचा राजा जशवंत पूर्वी राजाचे मयेंकडून पूर्वी श्रृंगारपूर व प्रभावळी पट्टणाचा प्रभू सूर्यराजा समीप पळून गेला, तो राजाहीं याला संरक्षण करीत होता ते राजे । पूर्वीं अपराधी असूनहीं पराधीन, त्यामुळें त्यावरि अपराध न मानितां उपेक्षा करून चित्रपुळीन दुर्गास जाऊन तेथें श्री परशुरामस्वामीचें दर्शन घेऊन बहुत पुजन करून श्री भार्गवां पासून वरहीं संपादून त्या प्रांती त्यानी दिल्ला करभार घेऊन ब्राह्मणास बहुत दान धर्म देऊन संगमेश्वर दुर्गास गेले । तेथील म्लेछे पूर्वींच राजभयें कडून पळून गेले । तो देशही स्वाधीन करून घेऊन तेथेंच जसवंतानी नीलकंठ राजाचे पुत्र ब्राह्मण मल्लसूराचा वंशस्य त्या नेतोजी समवेत राजाचे निरोपावरून संगमेश्वरास येऊन पावले । तदनंतरें महाराजानी सूर्य राजावरी दया करून "संगमेश्वरी माझें सैन्य आहे, तुमचेंसें समजणें; कांहीं दुर्बुत्धी न करणेसे” राजास हारका-या समागमें सांगून पाठऊन आपणास शरण आले ते राजे लोकांस अभय देऊन राजपुरास पाठऊन तेथें असूनच समुद्रतीरींच राहणार कित्येक फरंगा व द्विपांतरी असणार समुद्रांत जाहाजाच्या व्यापार करणार व समस्त राजांस स्ववशकरून त्यांकडून अनेक करभार घेऊन आणि राजपुरीं अस्तां शिवाजी राजास अंजन न घालितां बहूत द्रव्य मोहराचा कढाया दृष्टीस पडल्या तेहीं घेऊन आणि बहुत सामान त्या त्या देशाधिपति कडून करभार अणऊन त्याकडून घेतला समान सोनें,