त्याची भेटे घेऊन त्याकडून अनेक सन्मान पाऊन राजासमीप येऊन पावले । ऐशासमई पट्टलाने रानास जोहार लांच घेऊन सोडिलासें अनुमान मानून जोहारास राजाकडून लांच घेतलास ते द्रव्य देणें नाहितरी तुझें पारपत्य केलें जाईलसें पत्र पाठीवलें । ते पाहून मनस्तापकडून अपलें सैन्य घेऊन कर्णपुरास निघून गेला । आपलें भय नाहींसे निघून गेला ह्मणावयाचे द्वेष नें कित्येक ताम्रमुखास पाठविला । त्या ताम्रमुखानी वीष देऊन जोहारखानास मारिले । राजगडांत शिवाजीराजयानी ताम्रमुखी चक्रावती आणी संग्रामदुग भांडून घेतलें। वर्तमान अैकून, मंत्रीस बलाऊन, आतां ताम्रमुखावरी युत्धास जावयास अनेकद्रव्य पाहिजे त्यास्तव कित्यक राजे जिंतून यावेसे ह्मणतांच मंत्री प्रत्युत्तर दिलेः जे महाराजानी केली तजवीज युक्तच युत्धासही निघावे, परंतु दिल्लीश्वराचा मामा सांप्रत पुनेंत आहे; तो महाराज राजगडास आलें वर्तमान ऐकून अमचें राज्य सिंव्ह पर्वत प्रांत आक्रमणेंच योजून कारतलबमण्णास कांहीं सैन्य समेत पाठवणेंस निश्चय केला आहे । त्यास्तव तो मार्ग निरोधात्, म्हणतांच ते ऐकून आपण सैन्यानिशी जयवल्ली प्रांतास जाऊ खालील आंतील राणांत लोक दबऊन ठेविले। त्यानंतरें करतलबखान व अमरसिंव्ह आणि राजे व्याघ्री व जसवंत व सूर्य राजा व कोकाटे व मित्रसेन हे समग्र स्वसैन्य समेत निघून भीमपूर व कल्याणपूर व पण वल्लीपूर व कश्चपदेश हे समग्र स्वसैन्य समेत निघून भीमपूर वगैरे स्वाधीन करून घेऊन लोहादीचे राणचे मार्ग सिंव्ह पर्वत उतरून त्या खालील राज परदळ समेत होते ते नकळतां राणी प्रवेशून दोनें तीनें दिवस वास करून पलिकडें साधणेंस निघाले । तेव्हां शिवाजी राजे समोर निरोधिले। दो भागी होते ते राज सैन्यकही घेऊन उम्रगांवचे राणांत बहुत युत्ध केलें। उभयतांस युत्ध होतांना यवन सैनिकास युत्ध शक्ती नाहीशी जाहली । तेव्हां राज ब्याघ्री मण्णारी सरदारीणे