Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

ह्या वंशावळींत देवराजजी प्रथम दक्षिणेंत आला असें म्हटलें आहे. ज्याअर्थी राणा लक्ष्मणसिंह चितोडकर इ. स. १२७५-१३०३ पर्यंत हयात होता व देवराजजी त्याच्यापासून सहावा पुरुष होता, त्याअर्थी दर पिढीस २२ वर्षे धरिल्यास, देवराजजी इ. स. १४१३ पासून १४३५ पर्यंत हयात होता असें दिसतें. म्हणजे सातारकर भोसल्यांचे पूर्वज इ. स. १४१३ पासून १४३५ च्या अवधींत केव्हांतरी दक्षिणेंत आले असें होतें. परंतु सातारच्या घराण्याशीं संबद्ध असलेल्या सावंतवाडीच्या सावंतांपैकीं न-यसी देव इ. स. १३९७ त व भामसावंत १३६० पासून १३९७ पर्यंत हयात होते व त्यांचे पूर्वज इ. स. १२६० च्या सुमारास कोंकणांत होते असें वर सिद्ध केलें आहे. तेव्हां राणा लक्ष्मणसिंह चितोडकराच्या पूर्वी सावंतवाडीकर भोसले कोंकणांत प्रसिद्ध होते असा ह्या सिद्धीचा अर्थ होतो. म्हणजे भोसले हें आडनांव लक्ष्मणसिंहाच्या अगोदरचें आहे असें म्हणावें लागतें; परंतु सातारच्या बनावट वंशावळींत भोसाजीपासून भोसले हें आडनाव पडलें असें म्हटलें आहे. म्हणजे भोसले हें आडनांव इ. स. १३९० पासून १४१३ पर्यंतच्या अवधींत केव्हां तरी पडलें, असा ह्या विधानाचा अर्थ होतो. परंतु इ. स. १३६० पासून १३९५ पर्यंत राज्य करणा-या सावंतवाडीच्या भामसावंताचे आडनांवहि भोसलेच होतें. म्हणजे भोसले हें आडनांव ज्या कालीं पडलें असें बनावट वंशावळ सांगते, त्याच्या अगोदर तीस वर्षे भोसले हें आडनाव सावंतवाडीकरांना लावीत होते, अशी निष्पति होते. अर्थात् ह्या दोहोंपैकी कोणतें तरी एक विधान खोटें असलें पाहिजे. येथें कोणतें विधान खरें असावें ह्यासंबंधीं वादाला जागाच नाहीं. मठ येथील शिलालेखापेक्षां बनावट वंशावळींतील मजकूर अविश्वसनीय असावा असेंच म्हणणें भाग पडतें.

सातारकर भोसल्यांची म्हणून जी वंशावळ प्रसिद्ध झाली आहे ती बनावट आहे, हें मठ येथील ह्मा शिलालेखावरून उत्तम सिद्ध होतें. भोसले हें आडनांव शिर्के, मोहिते, मोरे, जाधव वगैरे आडनांवांप्रमाणें महाराष्ट्रांत फार जुने आहे. तसेंच शिर्के, मोरे ह्यांच्याप्रमाणेंच भोसल्यांचें कुळ महाराष्ट्रांतील अस्सल आहे. त्याचा संबंध चितोडच्या रजपुतांशीं लावूं जाणें अशास्त्र आहे. शहाण्णव कुळींतील मराठे ज्यांना म्हणतात, ते जातिवंत क्षत्रिय होत. व ह्यांनाच मी मराठा किंवा महाराष्ट्र क्षत्रिय असें विशेषण मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या चवथ्या खंडाच्या प्रस्तावनेंत दिलें आहे. ज्याप्रमाणें मराठा ब्राह्मण म्हणजे महाराष्ट्रांतील ब्राह्मण त्याप्रमाणेंच मराठा क्षत्रिय म्हणजे महाराष्ट्रांतील क्षत्रिय, असा अर्थ समजावा. ह्या महाराष्ट्र क्षत्रियांनीं रजपुतान्यांतील रजपुतांशीं संबंध जोडण्यास धावूं नयें. कारण जातिनिर्णायक असे जें संस्कृत ग्रंथ आहेत त्यांत रजपूत म्हणजे क्षत्रियांची एक कनिष्ठ प्रकारची जात आहे असें म्हटलें आहे. तेव्हां त्यांच्याशीं तादात्म्य पावण्याची उत्कंठा इकडील कांहीं महाराष्ट्र क्षत्रियांनीं यद्यपि दाखविली व उपजातींचें एकीकरण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला तत्रापि त्यानें भोसल्यांचे कुळ चितोडच्या घराण्यापासून निपजलें, ह्या म्हणण्याला आश्रय मिळणें ऐतिहासिक रीत्या दुरापास्त आहे. शिवाय चितोडच्या घराण्याचें गोत्र, कुलदैवत, वगैरे पुष्कळ बाबी भोसल्यांच्याहून भिन्न आहेत, ही कथा निराळीच आहे. 

महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व आडनावें (१) धंद्यावरून, (२) खोडीवरून किंवा लकबीवरून, व (३) गांवावरून पडलीं आहेत. कित्येक आडनावें गोत्रावरूनहि पडलीं आहेत. शिवाजीच्या वेळेस जे लाखो नवीन धंदे देशांतील लोकांना मिळाले त्यांवरून मराठी, संस्कृत व फारशी नवीं व जुनीं आडनांवें प्रचारांत आलीं. मंत्री, डबीर, झुंजार, वगैरे आडनावें शिवाजीच्या वेळेपासून नवीन घराण्यांना पडली आहेत. मागें इ. स. १५४१ व १५५८ तील दोन लेख दिले आहेत त्यांत खालींल नावें व आडनांवें येतातः-
(नावें व आडनावें वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)