Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १२३ ] श्री. २० आगस्ट १७३१.
राजश्री भगवंतभाऊ पंडित अमात्य हुकमतपन्हा गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री फत्तेसिंग भोसले दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत जाणें. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळों आला " उभयत यजमानांची भेटी जाली. ते समयीं आपलें अगत्य करून त्यांचें आपलें सौरश करून दिलें नाहीं. आपला तो कितिलप्राय अंतराय नसतां विपर्यास चित्तांत येऊन नानाप्रकारचीं दुनिंध आपल्यावरी आणलीं आहेत हरएकविशीं थोरले महाराजांनीं आपणास बेलभंडारा दिल्हा आहे." ऐसा कितेक अर्थ तपशिलें लिहिला. ऐसियास, भेटी जालियानंतर राजश्री स्वामींनी आपलें स्मरण एक दोन वेळां केलें. ते समयीं आपलें आगमन जालें असतें तरी गोसावी यांच्या मनोगतानरूप सौरश होऊन येतें; परंतु आपणांस यावयास +++++++ अंतर होणार नाहीं. प्रसंगोचित मजकूर कळों जाईल प्रस्तुत येथीलकितेक अर्थ राजश्री लिंगो रघुनाथ सागतां कळों येईल. जाणिजे. छ २७ सफर. बहुत काय लिहिणे लोभ असो दिल्हा पाहिजे हे विनति. लेखनावधिमुद्रा..
˜ °
श्रीशिवशंभूस्वामिनि
शाहूभूपेशपार्थिवोत्तंसे l
परिणतचेतोवृत्ते. फत्तेसिं-
हस्य मुद्रेयम् ll