Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७४ ] श्री. १३ सप्टेंबर १७१५
राजश्री यादोजी पडवळ नामजाद व कारकून, किल्ले गगनगड, गोसावी यासीः-
अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहाकित रामचंद्र नीळकंठ आशिर्वाद व नमस्कार सु।। सीत अशर मया व अलफ. आर्जोजी कुसुरकर परागंदा होऊन आजरे विलातीस गेला होता. त्यास अभय देऊन आणिला आणि गांवावर पाठविला आहे. तुह्मीं याचें चालवून याच्या वतनाची सेवा गांवावरी घेऊन, गांवाची किर्दी महामुरी होऊन, ऐवज किल्यास पावेतों करणे याणें विनंति केली कीं, आपण वतनदार आहे, पूर्वीपासून आपला विस्वा व गांवीं जमीन चालत होती ते चालवावया आज्ञा करावी. त्यावरून आज्ञापत्र सादर केलें आहे. बीll
विस्वा जकाती मोंगल शहाआलम जमीन मौजे कुसुर
कोंकणांत उतरला तोपावेतों चालला, त्या १ पावाची भाटी.
अलीकडे चालत नाहीं, तरी स्वामींनी १ बसकेची भाटी.
चालवावा, ह्मणोन , त्यावरून पत्र सादर १ दखल ठिकण.
केलें . तरी पेशजी ३
चालत होतें त्याप्रमाणें चालवणें --- जमीन बिघे ५ हे
. १ पेशजी चालली असेल त्याप्रमाणें चालवणें. १
याप्रमाणें याचे मनास आणून चालवणें आर्जोजी खरा माणूस आहे यापासून अंतर पडलें असेल, तें क्षमा करून अभयपत्र सादर करून आणून पाठविला आहे. तुह्मीं याचे चालवावया अतर न करणें गांवची कीर्दी माहामुरी याचे हातून बरी करवणे याचे चालवावया अंतर न करणे छ २४ रमजान बहुत काय लिहिणें.
सुरुसुद.