Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ६९ ] श्री. ६ जून १७१३.
राराजश्री सोनजी घोरपडे नामजाद व कारकून कोट कोल्हापूर गोसावी यासी: -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री रामचंद्र नाळकंठ हुकमतपन्हा आशीर्वाद व अनुक्रमे नमस्कार सु।। अर्बा अशर मया अलफ राजश्री यादवराव शिवदेऊ नाडगौडा हवेली कोलापूर याणीं विनंति केली कीं, हम गांवगन्ना मोईनप्रमाणें चालत आहे. परंतु गांवगन्ना इनाम व विश्वा जकातीचा धामधुमेकरितां चालत नाहीं. तरी चालविला पाहिजे ह्मणोन विनंति केली. त्यावरून मनास आणून न पेशजी चालत होतें त्याप्रमाणें करार करून दिलें असे. बितपशील -
जकातीस विश्वा दरबैली गांगन्ना दर चावरी
रुका एक १ बिघा एक १
एकूण दर बैली रुका एक व चावरी बिघा एकप्रमाणें मोईन करून दिल्ही असे सदरहूप्रमाणें कळवीत जाणे. हक पेशजी पावत आहे त्याप्रमाणें पावणें सालदरसाल ताजा सनदेचा उजूर न करणें तालिक लिहून घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतून देणें. जाणिजे छ २४ जमादिलावल. निदेश समक्ष.
बार सुरु सुत बार.