Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
त्यावरी देशकांनीं सत्य स्मरोन वृत्तीचा करीना सांगितला कीं, तर्फ मजकूरचें वतन देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण पूर्वी विठ्ठल माद शेणवी याची, त्यास त्याच्या वडिलावरी पूर्वी दिवाणचा कसाला पडिला तेव्हां रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी यांच्या वडिलांनी देशकुळकर्णाची व गांवकुळकर्णाची तिसरी तकषीम विकत घेतली. त्या दिवसापासून तिसरे तकषिमेचा भोगवटा त्यांचा चालत आला आहे, त्यास विठ्ठल माद शेणवी मृत्य पावला, त्याचे पोटीं कोणी संतान नाहीं, अथवा त्यास कोणी दाईज गोत्रज नाही, नकल, वृत्ती दिवाणची, धणियानें तुमास दिली, तरी दोनी तकषिमा विठ्ठल माद शेणवी याच्या देशकुळकर्ण व गावकुळकर्ण तुह्मीं अनभवणें, एक तकषीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण विठ्ठल माद शेणवी याच्या वडिली रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी यांच्या वडिलास विकत दिली, त्याप्रमाणे विभागाचे गांवहि पूर्वीच वाटले आहेती ऐसें सांगितलें तें मनास आणून. त्याउपरि देशक तर्फ मजकूर व गोत बसवून आह्मांस वतनाचा करीना पुसतां आह्मीं सांगितला कीं, तर्फ मजकूरचे देशकुळकर्ण व गावकुळकर्णे विठ्ठल माद शेणवी याच्या वडिलाचीं असतां त्याच्यापासून आपल्या वडिली देशकुळकर्णाची व गांवकुळकर्णाची तिसरी तकषीम विकत घेतली तदारभ्य आमचा भोगवटा तिसरे तक्षिमेचा चालत आला आहे, आह्मीं काही विठ्ठल माद शेणवी याचे दाईज गोत्रज नव्हे, तुह्मास महाराज राजश्री साहेबी, विठ्ठल माद शेणवी निपुत्रिक, त्याचे वौशीं कोणी नाहीं, वृत्ती दिवाणची ह्मणोन तर्फ मजकूरचें वतन विठ्ठल माद शेणवी याचे, ऐसें समजोन दिल्हें, त्याउपरिं तुह्मीं आपला मुतालीक तिमाजी गोविंद वतनावरी पाठविला, ता वतनाचा कारभार करूं लागला, त्याची आमची कटकट जाहाली, धणी चंदीस दूर प्रांतें असता हा करीना आह्मीं कोणास सांगावा, याकरितां आह्मीं बाहीर पडोन देशावरी गेलों होतों, ऐशियास विठ्ठल गाद शेणवी याच्या दोनी तक्षिमा देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण आमची तिसरी तक्षीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण येणेप्रमाणें पूर्वापार भोगवटा आहे, त्याप्रमाणे तुह्मी आपल्या दोनी तक्षिमा वतन अनुभवावे आमची तिसरी तक्षीम आह्मांस द्यावी, ह्मणजे तुह्मीं आह्मीं समाधानरूप असोन आपल्या विभागाप्रमीणें वर्तावें. ऐसें आह्मीं सांगितलें. त्यावरून देशक तर्फ मजकूर व समस्त गोत यांनीं करीना मनास आणून तुह्मांस सांगितलें कीं, याच्या वडिली तिसरी तक्षीम विकत घेतलें आहे, त्याप्रमाणे भोगवटाही चालला आहे, तिसरी तक्षीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण पूर्वी विभागही जाहाला आहे, त्याप्रमाणे याचा यास देऊन तुह्मीं उभयतांनीं समजावें. त्यावरून आमच्या वडिलीं वतन विकत घेतलें, भोगवटाही पूर्वीपासून चालत आला आहे, याकरिता आमची तिसरी तक्षीम आह्मांस देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण तर्फ मजकूरची पूर्वील वाट्याप्रमाणें दिली. आह्मीं आपली तिसरी तक्षीम अनुभवून सुखरूप असावें. तुमच्या दोनी तक्षिमा वृत्ती देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण तुह्मीं अनुभवून असावें याप्रमाणे तुह्मी आह्मीं समाधाने असावें. याउपरि तुह्मां आह्मामध्यें कथळा नाही ऐसें करून तुह्मीं आपलें पत्र आह्मांस लिहून दिलें, आह्मीं हें आपलें पत्र तुह्मींस लिहून दिलें याउपरि ज्याकडोन अतर पडेल तो गोताचा अन्यायी पान, मान, तश्रीफ, आधीं तुमची, दुसरी आमची देशकुळकर्णाचा कारभार तुह्मीं आह्मी दिवाणांत करावा दफ्तर तुमचे घरीं असावें दिवाणातून पुढे वतनामुळे तुमा आमास मोडीमोडी होईल तें तक्षिमेप्रमाणें वाटोन घ्यावें सदरहू लिहिलेयाप्रमाणे देशक तर्फ मजकूर व गोत याच्या विद्यमानें तुमी आमी समजलों आणि आपले रजावदीनें एकमेकास पत्रे लिहून दिलीं असेती त्यास अन्यथा नाहीं. हें पत्र. सही छ १ माहे शाभान, सु।। सीत मया व अलफ वळी पत्रलेखन, सुमार १३३, एकशे तेत्तीस. याखेरीज सद वळी ३ तीन.