Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ५३ ] श्री. ६ नोव्हेंबर १७०५.
राजीनामापत्र शालिवान शके १६२७ पार्थिव नाम संवत्सरे मार्गसीर शुद्ध द्वितीया बुधवार, दर जागा किले प्रसिद्धगड उर्फ रांगणा, हजीर मजालस बेहुजूर-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
हजीर मजालसी समस्ता हुजूर रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी देशकुळकर्णीं व गांवकुळकर्णी देहाय तर्फ अजिरे यांनी राजश्री रामचद्र नीळकंठ भारद्वाजगोत्री देशकुळकर्णी व गांवकुळकर्णी तर्फ अजिरें यांस लिहून दिलें पत्र ऐसे जे - तर्फ मजकूरचें देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण बुन्यादी विठ्ठल माद शेणवी याचें होतें. त्याच्या वडिलापासून आपल्या वडिलांनी तिसरी तकषीम देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण विकत घेतलें. गांवहि विभागाप्रमाणें तिसरे तकषिमेचे वाटून दिले. त्याप्रमाणें आपले वाडवडिल परंपरा खात आले. विठ्ठल माद शेणवीहि आपले परंपरेनें दोनी तकषिमा देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण खात आले. ईश्वरगतीनें विठ्ठल माद शेणवी मृत्य पावला. त्याचे पोटीं कोणीं संतान नाहीं. अगर त्यास कोणी दाईज गोत्रज नाहीं नकल जाहालें. वृत्ती दिवाणची देखोन महाराज राजश्री साहेबीं तुमासीं अजराम-हामत करून देतां सारें वतन विठ्ठल माद शेणवी याचें समजोन अर्बा तिसैनच्या सालीं स्वामीनीं आपला मुतालिक तिमाजी गोविंद वतनावरी पाठविला तो महालासी जाऊन तर्फमजकूरचें देशकुळकर्ण व गावकुळकर्ण अनभवूं लागला. धणी चंदीस दूर प्रातें असतां हा करीना कोणास सागावयाकरिता आपण बाहीर पडोन देशावरी गेलो वडिलापासोन तिसरी तकषीम आपला भोगवटा, त्यास विक्षेप जाहला देखोन, बेळगांवीं राहोन कथळा केला त्यावरी सन अर्बा मयामध्ये महाराज राजश्री छत्रपतिसाहेबाची स्वारी प्रसिद्धगड ऊर्फ रागणा या जागा जाहाली ते प्रसंगी राजश्री त्र्यबकजी कानोजी सरदेसाई व खळोजी कानोजी देसाई व सभाजी रामाजी देसाई व शामराऊ मल्हार नाडगौडा तर्फ मजकूर हे राजश्री साहेबाच्या दर्शनास आले त्याबराबरी कृष्णाजी बाब शेणवीही आले. त्याणीं तुमची भेटी घेतली ते प्रसंगीं देशकास तुह्मीं विचारिले कीं , रामाजी विठ्ठल शेणवी हे बेळगांवास जाऊन आमच्या वतनास कथळा करिताती ह्मणोन. त्यास त्याणीं सांगितले जे, देशकुळकर्ण व गांवकुळकर्ण तर्फ मजकूर येथील तिसरी तकषीम त्याची, त्याचा भोगवटा चालत आला आहे, त्याप्रमाणे त्याची तकषीम त्यास द्यावी, आणि त्यास तुह्मीं समाधानरुप राखोन तकषीमप्रमाणे वतन अनभवून असावें, ऐसें आमच्या विचारें आहे, ऐशियास, शफतपूर्वक वचन द्याल तरी रामाजी विठ्ठल शेणवी यासी बेळगांवीहोऊन भेटीस घेऊन येऊन ह्मणोन त्यावरून तुह्मीं देशकाची गोष्टी मान्य करून देशमुखास व कृष्णाजी बाब शेणवी यासी शफतपूर्वक सांगितले कीं, रामाजी विठ्ठल शेणवी यास घेऊन येणें. त्यावरी देशक व कृष्णाजी बाब शेणवी महालास गेलेयाउपरी रामाजी विठ्ठल शेणवीं यास बेळगांवीहोऊन आणून छ १६ रजब सन सीत मया ये दिवशीं राजश्री त्रिंबकजी कानोजी सरदेसाई व रवळोजी कानोजी देसाई व संभाजी खंडोजी देसाई व शामराऊ मल्हार नाडगौडा आह्मास भेटीस घेऊन आले. आमच्या तुमच्या भेटी जाहाल्या तेसमयीं आह्मा समक्ष देसाई तर्फ मजकूर यास विचारिलें कीं, रामाजी विठ्ठल शेणवी व कृष्णाजी बाब शेणवी व अंताजी मल्हार शेणवी यांची देशकुळकर्णाची व गांवकुळकर्णाची तिसरी तकषीम आहे ह्मणतात ते कशी आहे ते आपले बेताळीस स्मरोन सांगा, तुम्ही देशमूख, आह्मांस व त्यास वडील आहा, जें सांगाल त्यास आह्मीं मान्य आहों ऐसें ह्मणितलें.