Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण व. ४ शुक्रवार शके १७१५.

विनंति, उपरि. राजश्री बाबाराव यांस इतके दिवस पाटिल बाबाजवळ ठेविलें यांतील प्रधान हेतू हा कीं येक आपला पुत्र हिंदुस्थानांत घेऊन जावा, त्यास वजारतीवर कायम करावें, त्यानें पाटील बावाचे ऐक्यतेंत असावें. म्हणजे गोडीचे पोटांत पातषाहींत आपला पाय कायम जाहला. दक्षणची सुभेदारी आहेच. यास च्यार रु। खर्च जाले तरी चिंता नाहीं. आपण नवाबाचे कारपरदाज जाहलों यांत खाविंदाचे दौलतीची तरकी करुन पाया मजबूत केला. असें कोणे कारपरदाजानें केलें नाहीं. तें आपण करून दाखविलें ऐसें होतें. आणि राव पंतप्रधान, आदिकरून सर्व रइसांवर दाब ! ऐसी मसलहत बांधून नवाबाचे मनांत ही गोष्ट बिंबऊन, परवानगी घेऊन मध्यस्तांनीं राजकराण षुरु केलें. पाटीलबावा यासीं करारमदार ठरला कीं या प्रकर्णी पातषाहाची नजर येक करोड ठरली. त्यांतील करार असा आहे कीं पुणियास गेलियावर तेथील बंदोबस्त खातरखा करून हिंदुस्थानांत गेलियावर हें कार्य सिद्ध करावें. येथें फौजेचें खर्चास ऐवज लागेल तो पुरवावा. आणि अनकूळ असावें. नवाबाचे पुत्रास वजिरीवर कायम करावें. त्याची नियाबत पाटील बाबानीं करावी, याप्रमाणें करार, त्यास पुणियास आले. पैक्याविसीं आणि मसलहतीविषई आम्हीं अनुकूळ असतां आज परियेंत आपला बंदोबस्त काय केला ? कीं ज्या बंदोबस्ताचे भरवसियावर हिंदुस्थानांतील कामें सातरखा करावीं हें अद्याप कांहीच द्रिष्टीस पडत नाहीं. करोड रुपये देण्याचा करार पैकीं चाळीस लाखपरियेंत आजपरियेंत पोंचून चुकलें. बाकी साठ लाख रु।। राहिले. अद्याप कोणतेही उपयोगाचें लक्षण दिसत नाहीं. केवळ सुस्त होऊन बसलां ! यांस काय म्हणावे ? याप्रमाणें बाबाराव यांस छेडणी फार आहे. बाबाराव यांचे सांतवन करतात कीं सुस्ती धरून बसले आहेत यांतच काम आहे. लौकिकांत आवका उठल्या, त्याजवर कितेकांचे अंत:कर्णांत संशय. यांत कांहीं विपरीत दिसल्यानें अधिक सावधगिरि जाली म्हणजे गोष्ट बहकण्यांत येऊन आफ्तरी होईल, याज करितां पड़ घेऊन नरम चालीनें संशयनिवृति करून सुस्तीखालें टाकल्यावर कारस्थान चालेल. नाहींतर सर्व आफ्तरी होईल. याजकरितां च्यार दिवस दम धरून नंतर काय होतें तें पहावें, याप्रमाणें विप्र खातरजमा करित आहेत. त्यास ही बातमी आत्मिका कडून कळली नाहीं. विप्राचे घरांतील बारीक बातमी ऐकिली ती लिहिली आहे. या गोष्टीस खरें खोटें दोन्ही म्हणतां येत नाहीं. राजकारणाचा ग्रंथ जसा सिध केला तसा होतो. याजकरितां जें ऐकलें तें लिं आहे. मननांत असल्यानें बहुत उपयोग, हुषयारी तर राहिल ? यास्तव ही पुरवणी राजश्री नानास दाखवावी. यांचे उत्तर विशेष लिहूं नये. आमके तारखेचीं पत्रें पा तीं पावलीं, श्रीमंतांस दाखविलीं; इतकीच सूचना पुरे. र॥ छ २२ मोहरम. हे विनंति.