Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावणव. ९ शुक्रवार शके १७१५.

विनंति. उपरि जुजयातच्या आठ फर्दा ठरल्या, त्याच्या नकला राजश्री रघोत्तमराव यांनीं मध्यस्ताकडे पाठविल्या; त्याचे पारसी तरजुमे करून पाहिलें. नंतर बाबाराव यांस बोलाविलें. बाबाराव यांस समाधान वाटत नाहीं परंतु तसेंच यावें म्हणोन हुकूम गेला, तेव्हां गेले. तिघे जण साहा घटिका बसून खलबत केलें. आठ फर्दाच्या नकला करून पाटिल बावाकडे पाठऊन याचा जबाब लवकर आणवावा ऐसें सांगितलें. त्या फर्दानकला तयार करून रवाना जाल्या. कलम.---------१
इंग्रजांकडून साता कलमाची याद तहनाम्याची आली. त्याजवर विचार होऊन येक फर्द पुणियाहून ठरून आली. त्याची भवति न भवति करून श्रीमंतास उत्तर लिहावयासी आम्हांस सांगितलें या पुरवणीवर नवाबाचे दसखत करून घेतले. नंतर श्रीमंतांस पुरवणी लिहिली. त्याची नकल मध्यस्ता जवळ होती ती नकल करून पाटीलचबावाकडे पाठवावयासी बाबाराव यांस सांगितलें. कलम.---------१
पटणास टिपूसीं तहनामा जाला. त्याची नकल करून पाटीलबावाकडे पाठवावयाकरितां बाबाराव यांस दिल्ही. कलम.-------१
तीन कलमें
बाबाराव लाखोटा देतील तो टप्यावर पांच दिवसांत पावता व्हावा, आणि पांचा दिवसांत उत्तर लवकर यावें, ऐसी रवानगी जलद व्हावी म्हणोन आनंदराव सभापत यांस मध्यस्तानीं ताकीद केली. याप्रों बातमी कळली ती लिहिली असे. सारांश सर्व इतला गुह्य मार्गे पाटीलबावाकडे होतो हें ध्यानांत असावें. र॥ छ २२ मोहरम हे विनंति.