Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
राजश्रीया विराजित राजमान्यराजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी,

प॥ गोविंदराव कृष्ण सां नमस्कार, विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असिलें पाहिजे. विशेष, राजश्री राजे तेजवंत बाहादूर यांजकडोन नवाब बंदगान आली यांचें सरकारांतून फौजेचे व जातीचे सरंजामांत प॥ धारुरपैकीं कसबें आंतूर वगैरे देहात व प॥ चाळीसगांव पैकीं कसबे मजकूर वगैरे देहात जागीर जाले आहेत. राजे म।।र यांणीं सनदा महालीं आमीलासमागमें पाठविल्या. आमीलांनीं माहालचें वर्तमान लिहिलें कीं कसबें चाळीसगांव वगैरे पांच गांव आह्माकडे. पैकीं तीन गांव आबाद व दोन गांव हीन-कुल वैराण; व मौजे गणेशपुर, व मौजे गणपूर दोन गांव राणोजी पवार मोकासदार यांजकडे, व मौजे टाकळी व मौजे खडकी, व मौजे पिपरी सिवराम पंत सरदेशमुख यांजकडे, व मौजे पातोडे व मौजे तु-हडी व मौजे खरजाई व मौजे वाकडी हे च्यार गांव माधवराव रामचंद्र पागावाले यांजकडे. ये।। नव गांव परभारें वहवटतात. आह्मांस दखल देत नाहींत. आखर सालीं हात उचलोन काय देणें तें देतील. प्रस्तुत मोकासदार याजकडील गांवास फर्मास चिठी केली होती. त्यांचें उत्तर त्याणीं जमीदाराचे नांवें पाठविलें त्याची नकल पाठविली आहे, त्याजवरून कळेल, आह्मीं मोकासदार व सरदेशमुख व पागावाले यांस ह्मटलें कीं आमचे गांव सोडोन द्यावें. आह्मीं आपले देखरेख करून घेऊं. तुह्मीं आपला हिसा खा आकारा प्रो। घ्याव्या. त्यास ते ऐकत नाहींत. त्यास याचा बंदोबस्त जाला पाहिजे ह्मणोन आमीलाचे लिहिल्यावरून राजे मारनिले यांणीं आह्मांस सर्व मजकूर सांगितला, व बंदोबस्ताविसीं रा. नानांस, व तात्यांस, व गोविंदराव यांस पत्रें द्यावीं व तरफ ओतूर प॥ धारुर येथील मोकासा येशवंतराव बावने व पर्वतराव याजकडे. याचाही उपद्रववाचप्र॥ आहे. त्यास तरफ मारचा मख्ता सरकारांतून करार करून दिल्ह्यास आह्मी साहुकारी निषा देतों. त्याप्रों साल बसाल ऐवज पावता करून देत जाऊं. अथवा चाकरीस स्वार म्हटल्यास देऊं. निदान ह्या गोष्टी न घडल्यास मोकासदार यांस निक्षून ताकिदा याव्या कीं स्वराज्याचा अमल वाजवी मामुलप्रों घेत जावा. ज्यादा तलबी न करावी. याप्रों दोन्ही माहालचा बंदोबस्त करून देवावा तरीच आमची स्थित राहील. नाहीं तरी बखेडाच आहे. या प्रकारें फार बाजीद होऊन बोलिले. त्याजवरून राजश्री नानांस व तात्यांस पत्रें तुमचे पत्रावर हावाला घालून लिहिंलीं आहेत. त्यांस पत्रें प्रविष्ट करून पत्रान्वयें विनंति करून जावसाल ठराऊन परगणें चाळीसगांव व तरफ ओतुरें येथील मोकासदार, व सरदेशमुख, व पागावाले यांस निक्षून ताकीदपत्रें देवावीं कीं गांव याचे आमीलाचे हावालीं करतील व मामूलप्रमाणें आपला अमल कच्या आकाराप्रमाणें घेतील. कोणतेही गोष्टीची दिकत न राहे असें करवावें. राजे मा निले प्रहस्त थोर मनुष्य जाणून लिं आहे. येविसीं तुम्हास वारंवार स्मरण देण्याविसीं मारनिलेनीं रामकृष्णराव देवाजी यांस लिं आहे. ते स्मरण देत जातील. या प्रों सरकारांतून बंदोबस्त करून देवावा. र॥ छ १६ मोहरम बहुत काय लिहिणे ! लोभ कीजे हे विनंति.