Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
श्रावण वद्य ३ शंनिवार शके १७१५.

विनंति. उपरि. बाळाजी व्यंकटेश व येमा कामास रवाना केले होते त्यास बाळाजीपंत काल आले. सर्व मजकूर समजला. बंदोबस्त नीटच आहे. परंतु फार कान जाले. त्यावरून चित्तास प्रशस्त वाटत नाहीं. वर्कड़ सरकारात काहीं गुंता नाहीं. जर गोष्ट फायाषांत आली, ज्यास ज्यास समजेल तो फुटला तर पथ(त)च गेली. पुन्हा सबंध व समक्ष बोलावें हें राहिलें. सरकारास काये ? सर्व नीटच आहे ! धर्मच होये ! वर्कड मध्य वागणारास महत् संकट, दुरंदेशीनें पाहतां याचा विचार पडतो. मळमळित सारखें वाटतें, यास कसें करूं ? याचें समर्पक उत्तर यावें. वरकड सर्व नीटच आहे. क्रम चा(ल)ला आहे. करतों, दस्तकही घेतों. बाळाजी व्यंकटेश कोंकणचा ! निश्चयेंकरून आपलें उत्तर पावतेक्षणीं यावें ह्मणोन लिं. त्यास तुह्मीं लिहिला पर्याय इतकाही खरा. परंतु असीही गोष्ट येखादे वेळेस करणें प्राप्त होतें. तेव्हां छातिही केली पाहिजे. केवळ लोभावरच प्रकार नाहीं. फार कान जाले म्हणोन लिं. त्यास जे जरुरी या कामांत आहे त्यांस क(ळ)ल्या वेगळ कसें होतें ? दोघे, तिघे आपलेकडीलच आहेत. येक मुतसदी तेथून त्यांनी खाना तुम्हाकडे विश्वासूक केला. त्याची बाळाजी व्यंकटेश यांची गांठ वाटेंत पडली नाहीं. तो ग्रहस्थ तुम्हासीं येऊन भेट घेतली, तुह्मांस ताकीदपत्राच्या दस्तकाचा म।र पुसिला. तुह्मीं त्यास उत्तर केलें कीं हे आह्मास कांहीं वाकाफ नाहीं. हें वर्तमान मुख्याकडून आम्हांस कळलें. त्यास तुह्मीं आंगानिराळें टाकलें. बरें केलें ! त्यास कोणी यांतून फुटल्यास आमचा काय दस्तऐवज दाखविणार आहे ? दस्तऐवज दाखविल्यास बोलावयास जागा नाहीं ऐसें म्हणतील. ती गोष्ट तर नाहीं. मग काय चिंता आहे ? श्रीमंताचे प्रतापावरे यांत आम्हीं आहों. येक आपलेच सामर्थ्यावर नाहीं. ईश्वर पार पाडणार आहे ! सर्व सिधता जाली. हें सेवटास न्यावें. कोंकणांतील ठिकाणांत प्रवेश गुप्तरूपें जाला पाहिजे. याची तरतूद कसी केली ? ते लिहावी. उभयेतांसीं ऐवजाचा काये करार ? तुम्हीं काये केला ? हें लिहिलें नाहीं. तर जरूर कळवावें. यास घटिकेचा विलंब न करावा. हिशेब समजला पाहिजे म्हणोन लि आहे. याचे उत्तराकडे द्रिष्ट लागली आहे. तर लवकर उत्तर यावें, आळस न करणें, न करणें, र॥ छ १६ मोहरम हे विनंति.