मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसि जे–सांवतखान आमची भेट होऊन गेल्यानंतर मध्यस्ताकडे आह्मीं सांगोन पाठविलें कीं, “सेनासाहेबसुभा यांजकडून सांवतखान आले. आमची भेट जाली. खान म।।र यांस हुजुरचे आपले भेटीकरितां बादमगरबा घेऊन येतों,' याचे उत्तर मध्यस्तांकडून आलें. ‘ फार उत्तम आहे. खानमार यांस आपलें समागमें घेऊन अस्तमानीं यावें." खानास इस्तकबालीविषंई माधवराव रामचंद्र यांनीं मध्यस्तास अगोदर विचारिलें होतें. “इस्तकबालाचें प्रयोजन नाहीं " याप्र।। त्यांनीं सांगितलें. नेमाप्रमाणें अस्तमानीं आह्मीं मध्यस्ताकडें जाऊन खान आले त्यांची भेट करविली. सेनासाहेबसुभा यांचें खरितापत्र व वस्त्रें जवाहीर मध्यस्तास आणिलें तें खानांनी पावतें केले. आगतस्वागत बोलणें जालें. मध्यस्तांनी नबाबाकडें अर्ज करविला की “गोविंदराव, सेनासाहेबसुभा यांजकडील सांवतखान यांस मुलाजमतीकरितां घेऊन आले. ईर्षाद यावी. यांजला समागमें घेऊन बंदा हजर होईल”. च्यार घटका रात्रीं नबाब लालबागेनजीक चांदणीचे फर्षावर बारामद जाले. येण्याविषई मध्यस्ताकडें हुकुम आला. मध्यस्त, मी सांवतखानांसहित नवाबापासी जाऊन खान म।।र यांची मुलाजमत करविली. सेनासाहेबसुभा यांजकडील खरितापत्र व लग्नसमंधी वस्त्रें, जवाहीर गुजराणिलें. चंदा कंपनीचा नाच होता, मध्यस्त व मी समीप होतों. असद अलीखान प्रकर्णी खमम येथील हाथींचा जंगलातला व चोबीना वगैरे प्रकर्णी बोलणें जालें, मध्यस्तानीं सालगिरेकरितां नबाबास जवाहीर घावयाचें आणिलें तें दाखविलें. इत्यादिक होऊन फुलाचे हार बहुत प्रेमानें नवाबांनीं आह्मास व सांवतखान यांस दिले. याप्र।। खान म।।र यांचे मुलाजमतीचा तपसील कचा ध्यानांत यावा सबब विनंति.।। छ. २४ सवाल हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries