Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
वैशाख वद्य ८ शके १७१६ 

गुरुवार ता. २२॥५॥१७१४

विनंती विज्ञापना, भिस्तर किरकपात्रीक इंग्रजाकडील वकील भागानगरास गेला होता तो येथे आला ते अंबराईत राहिला. कारण की पहिला वकाल मिस्तर कनवी मंगळवार पेटेंत सेव्याचे वाड्यांत राहात होता. नंतर नबाब मंगळवार पेटेंत राहिले तेही जागा नबाबाचें तसरुकात होती. भिंती वगैरे जागा पाड पाड करून खराब केली तसेच जागेमध्ये इष्टवर होता. सांप्रतचा तरीक आंबईत राहिल्यास इष्टवर जाऊन त्यास मंगळवारांत येऊन राहावयाविसी आग्रह केला. त्यावरून उभयतां मिळोन जागा पाहावयास आले. जागा मरमततलब आहे सबब दुरुस्ती करावयास माणसे लाऊन मागती उभयतां आंबराईत जाऊन राहिले आहेत. जागा तयार जाल्यानंतर मंगळ वारांत रहावयास येणार. राा छ २२ षवाल हे विज्ञापना,