Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
ता. १६।५।१७१४ |

विनंती विज्ञापना. घाबेखान बीडवाला नवाबाचे सरकारांत सरदार आहे त्याजपासीं येक जमातदार म-हाटा ग्रहस्त हमेषा आह्मांकडे येणे जाणें घरोबा अशा रितीचा आहे, त्याने येक वर्तमान सांगितले की इंग्रजी दोनं पलटणे नवाबाकडे नौकर आहेत. ते कडप्याकडून हैदराबादेस आली, ती दोन पलटणे व गुंटुराकडील पांच येक सात पलटणे इंग्रजी लोक जगत्याळापर्यत गेली ते पाहुन येक दोघे स्वार आले. इंग्रजी पलटणे जगत्याळाहून झाडीचे मार्गे देवगड चांद्याचे रुखे ज्या जागी विठलपंत सुभेदार भोंसल्याकडील फौजसमवेत आहे त्याजवर अचानक रात्री जाऊन छापा घालावा यैसी बातनी आहे. भारामल विंठलपंत सुभेदारापासोन तीन कोसाचे फासल्यावर सोळा हजार फौज सुद्धा आहे. त्यास नबाबाकडील पत्रे सांडणी स्त्रारा बराबर गुप्तरुपें गेली की • पलटणे देवगड चांद्याचे मार्गे येतात त्याची बातमी ठेऊन तिकडुन पलटणे व येके बाजुने तुह्मीं येकसमई भोसल्याकडील फौजेवर हंगामाकरून फौज तार बतार करावी. याप्रा बातनी समजली ह्मणोन जमातदाराचे सांगणे ते यैकुन मात्र घेतले. परंतु याचा विध्यार करतां मनसब्यास अती गोष्ट येत नाहीं. कारण की गुटुरची पांच पलटणे इंग्रजी इंग्रज या कामास सहसा देणार नाहींत. इंग्रजांची दूरदेशी व मनसव्याचा पाला लांब, तह सोडून भलतीच गोष्ट आपण होऊन येकाकी कसी करतील? त्यांत इंग्रजांस फरासीसाचे मसलतीचा पायेबंद असा नाहीं को तुर्त काली त्यांनी डोई उचलुन दुसरी कोणती येक मसलत करावी. तेव्हा गुटुराकडील पलटणे हे गोष्ट कांहींच मिळत नाही. कदाचित मुसारेहमाचे लोक नवी पलटणे यांनी सजविली त्या पैकी असतील तर असेत. परंतु परभारी जगत्याळाकटून पलटणे पाठवुन भोंसले यांचे फौजेवर दगा करावा हेही धोरण दिसत नाहीं. जे गोष्ट दग्याने करणे ते जाहिराणा बोलण्यात येणार नाहीं. दौला सहजी येक दिवस आमास बोलले की ‘यलगंदल वरंगळ तालुक्याकडे दोन पलटणे इंग्रजी कडप्याकडुन आणविली. ईसामियानी तालुक्याचा बंदोबस्त केला. त्याजपासीही जभियत स्वार आहेत. पलटणे वरंगळ प्रांती राहिली असतांच जुरुर वगैरे बंदोबस्त ही बोलणी. भोंसले यांजकडील फौज जवळ आहे. आपलीही जमियत नजीक. हा दाब दाखऊन बोलले. याची विनी १३ : लिक्ष्यिांत अठ। ध आहे. यावरून वाटते की दगा करण्याचा मनसबा असतो तर पलटणे व स्वाराचा दाब बोलण्यात न येता. हा विच्यार पाहता बातनी सांगितली ते अशीच कांही दिसते. यौकले वतमात तें ध्यानांत यावे यास्तव विनंती लिहिली असे. राा छ १६ पवाल हे विज्ञापना.