Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४५६ ]

श्री

यादी वहिवाट सरकार राजश्री राजमंडळ कारकीर्द कैलासवासी थोरले शाहूमहाराज यांजपासून पेशवे सवाई माधवराव अखेर चालत आलीः--------

१ सरकारचें स्वदस्तूरचें निशाण व मुद्रा.
१ राजपत्रावर मुद्रा.
१ फडणिशी व चिटणिशी पत्रावर निशाण :------ बहुत
काय लिहिणें ?, व सुज्ञे असा, व छकार यथा सांप्रदायानें.
१ फडणिशी सनदेवर, व वरातेवर तारीख फड़णिसाची, व निशाण स्वामीचे.
१ चिटणिशी पत्रावर तारीख चिटणिसाची व निशाण स्वामीचें.
------

१ इनाम व सरंजाम गांव व वतन, हरकोणास द्यावयाचा हुकूम जाहलियास, त्याचीं राजपत्रें लिहून देणेंविशी पंतअमात्यास आज्ञापत्र होईल, त्याजवर निशाण स्वामीचें ; अथवा याद जाहलियास मखलाशीवर निशाण स्वामीचें.
१ नूतन राजपत्र करून देणें जाहलियास अमात्यास फडणिशी दफ्तरीं आज्ञापत्र लिहून निशाण स्वामीचें.
१ मालुमाती राजपत्र करून देणें जाहलियास अमात्यास चिटणिशीकडून आज्ञापत्र लिहून त्याज़वर निशाण स्वामीचें.
-----

----

१ पंत प्रतिनिधी याजकडे दाखला राजपत्रांवर शिक्का.
१ पंत प्रधान याजकडे दाखला राजपत्रावर शिक्का.
१ पंत अमात्य याजकडे राजपत्रावर निशाण. मजमूचे व इनामी
राजपत्रें नांवाचे व गांवचे मजमु दफ्तरी लिहावी.
१ पंत सचीव याजकडे सुरनिशी निशाण-सुरुसुद बार-राजपत्रांवर.
१ मंत्री याजकडे दाखला राजपत्रावर-संमत मंत्री.
१ सुमंत याजकडे दाखला राजपत्रावर-संमत सुमंत.
१ पंत राजाज्ञा याजकड़े सरकारी निशाणें.
१ राजपत्रावर संमत सरकार
१ रुजु खर्चाच्या चिट्या,-पोतें, जामदारखाना, कोठी वगैरे कारखाने --- यांजवर होतील, त्यांजवर, माहालचे हिशेबावर. शाहुमहाराज यांचे कारकिर्दीत.
------

१ कारभारी यांजकडे निशाण - परवागी- हुजुर चिट्यावर व माहालचे हिशोबावर, शाहु महाराज यांचे कारकिर्दीत
------

१ कारभारी यांजकडे निशाण - परवानगी - हुजुर चिट्यावर व माहालचे हिशोबावर, शाहु महाराज यांचे कारकिर्दीत
१ फडणीस यांजकडे हुजुरचे दफ्तर व फडणिशी काम.
१ राजपत्रावर बार व पाठीमागें तारीख.
१ सनदेवर व वरातेवर तारीख फडणिसाची व निशाण स्वामीचें.
१ नूतन इनाम व सरंजाम गाव व वतन हरकोणास द्यावयाचा हुकुम जाहल्यास, त्याची यादी अगर आज्ञापत्र पंत अमात्यास लिहिणें तें फडणिसांनी दफ्तरी लिहून तारीख करावी. निशाण स्वामीचे जाहलियावर आमात्यांनी राजपत्रें तीन ल्याहावीं. व चिटणिसाकडील तीन राजपत्रें तयार करून द्यावीं. हुजुर दफ्तरीं आल्यावर, बारनिशी पाहोन, बार ह्मणोन पाठीमागें तारीख घालावी.
१ चिट्यावर व माहालाचे हिशेबावर तारीख व एकुण हाती फडणिशी.
-------

१ चिटणिस याजकडे चिटणिशी कामाची पत्रें लिहिणें त्याचे कायदे.
१ राजपत्रें लिहिणें तारीख ध्धां.
१ हुजुरची पत्रें हातरोख लिहून तारीख चिटणिशी व निशाण स्वामीचें.
१ मालुमाती राजपत्रें देण्याविशीं आज्ञा जाहलियास, पंतअमात्य यांचे नांवे आज्ञापत्र चिटणिसांनी लिहून, निशाण स्वामींना करावें.
१ तहनामा ठरेल ते चिटणिसांनी ल्याहावा.
-------

१ बक्षी याजकडे लोकांची हजिरी, गणती, व चाकरी सांगणे.
१ पोतनीस याजकडे पोत्याचें काम कर्दिसुद्धां.

--------------