Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४५२ ]

श्री

यादी हिंदुस्थान प्रांती स्वकीय व इष्ट मंडळी त्यांची पूर्वपरंपरा स्मरःणार्थ ---हितगीरी असावी यद्यर्थ ईकडील गेले त्यांची व तीकडील आहेत ----- तपसील, सलाश असर मयातैन व आलफ.

राजश्री बाबुराव अंग्रे वजारतमाम सरखेल यांची वानवाडीचे ----- स्नेह होता. व सीकारीत वगैरे मुकामी आगत्य वादाची ------ झाली. त्यांत सांप्रत उजनीस चीटकोपंताबरोबर पत्र पाठविले.
त्यावरून त्यांची बरदास्त करविली. ते पंताजी पंताचे पणतुनी स ------ तलेच होत.

२ पींगोरी नजीक श्रीजेजुरीकर विठोजी सिंद्यापा। यांचे पुत्र बापुजी ----- येसाजी रामचंद्र वाईकर यांचकडे रस्त्याकडून वाल्हे येथें होती, त्याजकडे पिंगोरी, वगैरे खडे याची कमाविस, यामुळें आमचेकडे येणे जाणे, ------जीबावाचे व पूर्वील वडीलाचा स्नेह, ह्यामुळें बहुत उपयोगी वानवाडीत होते.

३ राजश्री यशवंतराव बापु कोरडेकर, आनंदरावजी नींबाळकर वाटारकर यांचे व्याही, यांचा पुरातन स्नेह आबा भोईटे जानोजीबावा हींगणगावकर यांचे आप्तकीमुळें व त्याचा थोरपणा जीवाभ्य उपयोग करतील.

४ बापु निंबालकर वाटारकर सर्वत्र भाऊ ह्याचे पुतणे व ह्याचे पुत्र दाजीबा आदीकरून उपयोग अभिमानी.

५ वांईकर खानमहमदाचे मेहुणे हुसेनखान रसुलखानाचे बंधु पसरणीकर वोळख धरतील तर.

६ बापु माहाडीक राघो आपाजी निजाम पाडलीकराचे बंधू, मातबर पथिके, भीडही मोठी दादाचे, व पूर्व अनादी स्नेह वडीलार्जित स्मरावयाजोगे, संभावित, आपले उपयोग, जीवा भय करावयाचे.

७ भगवंतराव बाबाजी॥ बालाबाई सितोले जीवनराव माहादेव यांचे चुलते, आप्तवर्गा उपयोग करतील. त्यांचे मेहुणे बापु कवीजंग बारगांवीं आले होते ते परिचयांतील आहेतच त्यांचे मंडळात बाबाजी यादव याचे पुत्र कृष्णराव भाऊ व तात्या फडणीस नीसबत सितोले.

८ राजश्री रामचंद्र भास्कर, अन्याबा राजापुरकर कारभारी ------- अर्थ कुंटुबांतरगत स्त्रीपुरषांत फत्तेसिंगबावाचे कारकीर्दीत आह्मी राथेंत आलो तेव्हांपासोन ह्यांचाही स्नेह अद्वीतीय भरवंसा.